उमरखेड /ढाणकी येते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी.
ब्योरो रिपोट एस.के.चांद चीफ
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त आज ढाणकी शहरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रीय महासचिव विद्वानभाऊ केवटे हे लाभले होते.
“साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे अन्यायाविरुद्ध बंड करायला लावणारे अंगारिक साहित्य आहे.त्यांच्या साहित्यातून त्यांनी मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात बहुजन महापुरुषांचा विचार मांडून देशात,जगात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वैचारिक घाव घालूनच परिवर्तन केल्या जाऊ शकते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.”
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार प्रेम केदार साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू पाटील चंद्रे, नगरपंचायत अध्यक्ष सुरेश जयस्वाल, नगरपंचायत उपाध्यक्ष जहीर भाई, अमोल तुपेकर, मिलींद चिकाटे,दत्त दिगंबर वानखेडे,रोहित वर्मा,अमोल पाटील,शेख जब्बार भाई, हे होते.
यावेळी बाळू पाटील चंद्रे यांनी आपल्या मनोगतातून युवकांनी व्यसनमुक्त होऊन महापुरुषांच्या विचारांचे आचरण करावे असे आवाहन करीत अभिवादन केले.
अध्यक्ष स्थानावरून सुरेश जयस्वाल यांनी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे असे सांगितले.
यावेळी विजू वैद्य, संबोधी गायकवाड,रमेश पराते, बंटी जाधव,प्रकाश कांबळे,राजू हनवते यांसह अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संचलन जॉन्टी विणकरे यांनी तर आभाप्रदर्शन मा.संजय पडोळे यांनी केले.
अठरापगड जाती धर्मातील बहुजन बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम एकतेचा संदेश देत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक संजय पडोळे,मारुती पडोळे,दिलीप कलाले,मनोहर पडोळे, अनिल सोळंके,बालु पडोले,यांसह अनेक समाजबांधवांनी परिश्रम घेतले.