जरांगे पाटील यांना दर्जाची सुरक्षा द्या : प्रतीक पाटील नरवाडे
यवतमाळ / एस. के. शब्बीर यांची बातमी.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आता त्यांच्या सुरक्षितेसाठी तात्काळ दर्जाची सुरक्षा उपलब्ध करून द्या अशी मागणी प्रतीक पाटील नरवाडे यांनी केली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या घरावरून ड्रोन कॅमेरा जरी फिरला तरी तो कोणाचा होता ? हा प्रश्न उपस्थित करून त्यांना सुरक्षेतेसाठी शासन मोठी जबाबदारी हाती घेते.
आज मनोज जरांगे पाटील म्हणजेच महाराष्ट्रातील करोडो मराठा समाजाचे दैवत असल्याची प्रतिमा आहे. त्यांना काही हानी पोहचल्यास महाराष्ट्राचे वातावरण बिघडणार तर नाही, याची काही हमी आहे का ? म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत लोकशाही मार्गाने समाजाच्या हिताचा लढा देण्यासाठी सुरक्षा करणे हे आपल्या घटनेत नमूद असून अशा लोकांची सुरक्षा हे हितकर ठरते. याच्यासाठी सामाजिक सलोखा अवघीत ठेवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा ही महत्त्वाची ठरते. मनोज जरांगे पाटील यांना अनेक वेळा धमक्या सुद्धा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची आवश्यकता आहे. कारण त्यांनी १४ जुलै हे सरकारला शेवटचे अल्टिमेटर दिले असल्यामुळे त्यांच्या कुठे घातपात तर करायचा नाही असा संशय निर्माण होत असल्याने त्यांना दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी समाजसेवक प्रतीक पाटील नरवाडे यांनी केली आहे. ( प्रती )