हिमायतनगर येथील मुस्लिम समाजातर्फे विशालगड व गाजापुर येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नोंदीला निषेध.
हिमायतनगर प्रतिनिधी सय्यद मनान
कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गाजापुर येथील काही विघ्न संतोषी समाजकंटक यांनी जमा मस्जिद पाडून आतील पवित्र धर्मग्रंथ कुराण जाळून तेथील मुस्लिम वस्तीवर अचानक हल्ले करून त्यांचे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कठोर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन हिमायतनगर येथील मुस्लिम समाजाचे वतीने पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भगत साहेब यांना आज दि. रोजी १८\७\२०२४ लेखी निवेदन देण्यात आले तसेच तालुका दंडाधिकारी हिमायतनगर व महाराष्ट्र शासनाला पोलीस प्रशासनामार्फत निवेदनाच्या प्रती पाठवून तुमच्या भावना कळविण्यात येईल अशी गवाही पोलीस निरीक्षक भगत साहेब यांनी दिली सदर निवेदनावर हिमायतनगरचे ज्येष्ठ काझी मोविजोद्दीन अजीज मौलाना मुजीब खान पठाण, अन्वर खान पठाण अश्रफ खान पठाण, अब्दुल मन्नान जाहीद मौलाना, खलील मौलाना, असद मौलाना, सय्यद रफिक भाई, सय्यद अजीम, शेख.अस्जद आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत यावेळी बीट जमादार कोमल कांगणे ताई व तसेच नागरगोजे पोटे साहेब आदी कर्मचारी उपस्थित होते.