ताज्या घडामोडी

उमरखेड न्यूज / साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकार पुरस्कार द्या. लहुजी क्रांती मोर्चा याची मागणी.

उमरखेड न्यूज / साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकार पुरस्कार द्या. लहुजी क्रांती मोर्चा याची मागणी.

 

 

महाराष्ट्र चीफ एस.के. चांद यांची रिपोट.

 

 

शोषित श्रमिक कामगार आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बदावलेली भूमिका दिलेल्या योगदान हे अमूल्य आहे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगातील 27 भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे सात समुंदर पार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्यशाली इतिहास जगाला ठणकावून सांगणारे व भारत देशाची मान उंचविणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना आजही उपेक्षित ठेवले जात आहे राष्ट्र प्रेमा खातर मराठी साहित्याच्या माध्यमातून क्रांतीचे रणशिंगे फुंकणारे अण्णाभाऊ साठे यांना तात्काळ भारतरत्न पुरस्कार भारत सरकार यांनी जाहीर करावा गीतकार गायक चित्रपट कथाकार नेता अभिनेता दिग्दर्शक कामगार कामगार नेता संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सेनानी असे असले तरी या महापुरुषाची भारत सरकार व महाराष्ट्र सरकारकडून अवहेलना केली जात असल्याचे दिसून येत आहे 18 जुलै 2024 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनास 55 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्य लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने भारत सरकार व महाराष्ट्र सरकारकडे खालील मागण्या करत आहेत

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मराठी भाषेमध्ये विपुल साहित्य संपादा निर्माण केलेली आहे त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक ऑगस्ट हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर करावे

एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सरकारने सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आणि कर्तव्य लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना तत्काळ भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा

महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी निधीची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्ष अर्थसंकल्पनामध्ये या गोष्टीला केराची टोपली दवाखान्यात आलेली आहे त्यामुळे सरकारने लोक भावना विचारात घेऊन केलेल्या घोषणेप्रमाणे विशेष अधिवेशन बोलावून या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यात यावी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चिराग नगर येथील घराच्या स्मारकाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जदारांसाठी लागू केलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात

क्रांतिवीर फकीरा यांच्या समाधीचा जिर्णोद्वार लवकरात लवकर करण्यात यावा

मातंग व तत्सम जातीवरील होत असलेल्या गंभीर अन्याय अत्याचाराच्या घटना तपास s i t कडे देऊन हे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे

यासाठी राज्यपाल महाराष्ट्र राज्य मार्फत तहसील कार्यालय उमरखेड निवेदन देण्यात आले यावेळी लहुजी क्रांती मोर्चा चे जिल्हा पुसद कोषाध्यक्ष दिलीप कलाले रामा पवार बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे मिलिंद चिकाटे आदी उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *