महागांव /खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी रामहरी अडकिने
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर
महागांव तालुक्यातील वरोडी येथील प्रगतीशील शेतकरी रामहरी पाटील अडकिने यांची महागांव खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी एक मताने निवड करण्यात आली. या निवडीचे श्रेय रामहरी पाटील अडकिने यांनी सर्व संचालक संचालिका मंडळाला दिले. त्यावेळेस खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विशाल पवार, उपाध्यक्ष शुभांगी पवार, संचालक देविदास राठोड, पांडुरंग करपे, सीमा नरवाडे, माधवराव सुरोशे, हनवंतराव देशमुख, रोहिदास पाटे, डिगांबर राठोड, विजय राऊत, पंजाबराव सरदार, विद्या पाटील, वर्षाबाई राठोड, सतीश ठाकरे, बाबुराव व्हडगीरे उपस्थित होते. ( प्रती )