क्राईम डायरी

यवतमाळ शाखा यांनी अवधुतवाडी येथील खुनाचे गुन्हयातील चार आरोपीतांना केली अटक.

यवतमाळ शाखा यांनी अवधुतवाडी येथील खुनाचे गुन्हयातील चार आरोपीतांना केली अटक.

 

यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी लतीब शेख.

 

 

दिनांक १२/०७/२०२४ रोजी फिर्यादी नामे राहुल भानुदास भानावत वय ३० रा. जांबरोड, बेले लेआउट वडगांव यांनी पो.ठाणे अवधुतवाडी येथे फिर्याद दिली की दिनांक १०/०७/२०२४ रोजी त्यांचा लहान भाऊ रोहीत भानावत हा त्याचे कामासंबधाने बाहेर गेला होता तो दुपारी एक वाजता जेवन करुन गेला होता त्याचे अंगावर निळसर पांढरे रंगाचे डिझाईन असलेले शर्ट होते व डार्क निळ्या रंगाची जिन्स घातली होती तो घरुन गेला तसा घरी परत आला नाही. त्याचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता त्यामुळे त्याचे नित्याचे बाहेर जाणे येणे होते आज रोजी फिर्यादी यांना त्यांचे भावाचा मृतदेह ईश्वर नगर यवतमाळ येथील हनुमान मंदीराचे बाजुला असलेल्या जंगलात असल्याची माहिती मिळाली वरुन फिर्यादी यांनी घटनास्थळी जावुन पाहाणी केली असता घटनास्थळावरील मृतकाचे अंगावरील कपडयांवरुन त्यांना तो त्यांचा भाऊ असल्याची खात्री झाली. मृतकाचा चेहरा दगडाने ठेचल्यामुळे विद्रुप झाला होता. त्यांचे भावास आरोपीत नामे १) वैभव नरेंद्र घोडाम वय १८ वर्षे, रा. राधाकृष्ण नगर मुलकी यवतमाळ, २) रवि रामरावजी उईके वय १९ वर्षे रा. देवनगर मुलकी, ३) सुरज उर्फ मुन्ना देविदास धुर्वे वय २४ वर्षे, रा. आशिर्वाद नगर, यवतमाळ, ४) अमोल प्रभाकर गाडेकर वय २५ वर्षे, रा. राधाकृष्ण नगर मुलकी यवतमाळ यांनी जिवानिशी मारल्याचे समजले अशा स्वरुपाचे तक्रारीवरुन आरोपीतांविरुध्द अप.क्र. ८३१/२०२४ कलम १०३ (१) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक सो यांनी स्था.गु.शा. यवतमाळला गुन्हयातील आरोपीतांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी मोजक्याच कालावधीत आरोपीतांचा माग काढुन आरोपी नामे १) वैभव नरेंद्र घोडाम वय १८ वर्षे, रा. राधाकृष्ण नगर मुलकी यवतमाळ, २) रवि रामरावजी उईके वय १९ वर्षे रा. देवनगर मुलकी, ३) सुरज उर्फ मुन्ना देविदास धुर्वे वय २४ वर्षे, रा. आशिर्वाद नगर, यवतमाळ, ४) अमोल प्रभाकर गाडेकर वय २५ वर्षे, रा. राधाकृष्ण नगर मुलकी यवतमाळ यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पोलीस ठाणे अवधुवाडी यांचे ताब्यात दिले आहे.

 

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील अधिकारी अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *