आरोग्य

ढाणकी यांच्यावतीने आज निसर्ग संवर्धन समिती असा उपक्रम. 

ढाणकी यांच्यावतीने आज निसर्ग संवर्धन समिती असा उपक्रम.

 

ब्यूरो रिपोर्ट/अजीज खान

 

सर्वत्र अवैध्य वृक्षतोड होत असताना काही दिवसापासून निसर्ग संवर्धन समिती उदयास आली. त्यात त्यांनी झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम हाती घेतली. लेखकांनी ,कवींनी, कादंबऱ्यात व संत महात्म्यांनी सुद्धा वृक्षाचे महत्व पटवून सांगितले आहे. परंतु हे जरी सत्य असले तरी अनेक प्रमाणात वृक्षतोड होत आहे परंतु वृक्ष लावण्यास कुणीही धजावत नाही. त्याच अनुषंगाने आज टेंभेश्वर नगर दत्त मंदिर प्रारंगणामध्ये विविध वृक्षाची लागवड करण्यात आली. त्यात विविध संघटना, विविध समित्या, निसर्ग संवर्धन समिती ढाणकी,

औदुंबर वृक्ष संवर्धन समिती उमरखेड,

युथ फाऊंडेशन उमरखेड

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था, उमरखेड

हेल्थ इस वेल्थ योगा ग्रुप ढाणकी

श्रीराम योगा ग्रुप ढाणकी

जलतरणपटू गृप ढाणकी

सर्पमित्र संघटना

पक्षी मित्र संघटना

ढाणकी शहर पत्रकार संघ

दर्पण पत्रकार संघ

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना

व्यापारी महासंघ

प्रकाश जाधव, अनिल जाधव

अतुल येरावार विक्रम टी कंपनी

नगरपंचायत ढाणकी

कृष्णानंद मुनी महाराज यांच्या सर्व संघटनेला वृक्ष लागवडीसाठी निसर्ग संवर्धन समिती ढाणकीच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते यांचा सन्मान करून यांच्या हस्ते यावेळी वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विवेक पत्रे, प्रकाश जाधव, दीपक ठाकरे, प्रा महेश चंद्रे, अतुल येरावार ,प्रभाकर दिघेवार, सुभाष कुचेरिया, रमण पाटील रावते ,संजय सल्लेवाड,अशोक गायकवाड हे होते . सूत्रसंचलन पत्रकार नागेश महाजन यांनी केले तर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक संतोष तीरमकदार यांनी केले त्यात त्यांनी वृक्षाचे महत्व पटवून सांगताना वृक्ष लागवड हे काळाची गरज असून प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी त्यात निसर्ग संवर्धन समितीस लाभलेल्या योगदानाबद्दल कशी मदत मिळाली ते त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. पत्रकार संजय भोसले यांनी मनोगत व्यक्त करत असताना आपण सर्व सजीव हे निसर्गाशी निगडित असून निसर्ग हे अन्नसाखळी असून सजीवांना एकमेकावर अवलंबून राहावे लागते .त्यामुळे इथे निसर्गाशी निगडित असलेले सर्व पशु मित्र, सर्पमित्र , निसर्गप्रेमी हे सर्व उपस्थित आहेत. वृक्ष लागवडीचे कार्य सर्वांनी हाती घ्यावे व निसर्ग संवर्धन समिती स सर्वांचे योगदान लाभावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यात डॉ. पत्रे , प्रभाकर दिघेवार, दिलीप भंडारे, कृष्णानंद महाराज, यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन दीपक चंद्रे यांनी केले. यावेळी निसर्ग संवर्धन समिती ढाणकीचे सदस्य गजानन मिटकरे, महेश चंद्रे, दीपक चंद्रे, ओम खोपे,संतोष तिरमकदार ,लांडगे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टीपूर्णे, नारायण मुटाळे ,आदी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *