महागांव तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करा.भाविकभाउ भगत हेल्प फाउंडेशन.
यवतमाळ संपादक. एस. के. शब्बीर.
महागांव तालुक्यातील व परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करणे बाबत…
भाविकभाउ भगत हेल्प फाउंडेशन व राजुरा, बिजोरा, कोठारी, साधुबनगर नांदगव्हाण, घानमुख, दगडयर, नेहरूनगर, मुडाणा,हिंगणी ,धारमोहा ,धारेगाव,
शेणद,लोहरा,बोथा,बेलदरी समस्त गावकरी मंडळी यांनी महागांव तालुक्यातील व परिसरातील शेतकरी व गोर-गरीब जनतेला विद्युत पुरवठा वारंवार जात असल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी यांना रात्री बेरात्री शेतात जावुन विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास जावे लागते. त्यामुळे तालुक्यातील व परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा.
आणि तसेच परिसरातील बरेच ठिकाणी झाडाच्या मध्यभागातुन विद्युत तार गेलेले आहे. ते सुध्दा बरोबर करून देण्यात यावे. काही शेतात ब-याच प्रमाणात शेतात हे विद्युत जिवंत तार लोमकाळलेले आहेत ते सुध्दा बरोबर करून देण्यात यावे. जेणे शेतक-यांचे किंवा शेतातील जनावरांची जिवित हानी होणार नाही. याची दक्षता घ्यावी. तसेच परिसरातील गावे राजुरा, बिजोरा, कोठारी, नांदगव्हाण, घानमुख, दगडयर, नेहरूनगर, मुडाणा, अनेक इतर अनेक गावातील नागरीकांनी वरील दर्शविलेले काम हे पावसाळा सुरू होण्यापुर्वी करण्यात यावे. शेतक-यांचे हितासाठी आम्हाला तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. होणारे नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील.
या वेळी संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत विष्णू चौधरी तेजस ठाकरे पाटील अमोल राठोड विजय वाघमारे अमोल मोहकर राहुल वानखेडे गोलू जाधव परमेश्वर जाधव मिथुन पिंपळे पवन राठोड देवानंद राठोड प्रकाश रणमले गणपत रिठे ज्ञानेश्वर रणमले प्रशांत राठोड गजानन इंगळे शुभम कड दिनेश ठाकरे शिवराज जाधव नितीन वाघमारे अरविंद भडंगे काशिनाथ पाटील देविदास मोहकर व सदर प्रकारचे निवेदन देण्यात आले.समस्त परिसरातील गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होती.