यवतमाळ न्यूज /सरोज देशमुख यांच्यावरील तडीपार आदेश रद्द करा.
जगदीश नरवाडे यांची मागणी.
प्रतिनिधी, महागांव
सामाजिक कार्य करीत असताना न्याय मिळविण्यासाठी घटनेने घालून दिलेल्या अधिकारांचा वापर करून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवुन देण्यासाठी आंदोलने केल्याचा ठपका ठेवून सामाजिक कार्यकर्त्या सरोज देशमुख यांना तडीपार करण्यात आले. .परंतु कोणत्याही आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान किंवा सर्व सामान्य नागरिकाला कोणताच त्रास झाला नसताना तडीपारी सारखे गंभीर गुन्हे दाखल त्यांच्यावर केले आहेत. शासनाने सर्व आंदोलनाची पार्श्वभूमी तपासून सरोज देशमुख यांच्यावरील गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिले निवेदन.
उमरखेड येथील सामाजिक कार्यकर्त्या सरोज नंदकुमार देशमुख या घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी करुन भ्रष्टाचार अन्याय अत्याचाराच्या विरोधात अनेकवेळा आंदोलने करुन सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देण्याचे काम केले.
भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन उभे करुन न्याय मागणे हा गुन्हा नाही. देशमुख ह्यांच्यापासून तालुक्यातील व शहरातील व्यापाऱ्याला कोणताही आजपर्यंत त्रास नाही व . त्यांच्यापासून कुणालाही नुकसान झालेले नसुन, त्यांनी कोणत्याही व्यापाऱ्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली नाही, त्यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. त्यांच्यावर असलेले गुन्हे हे काही महिन्यापुर्वीचे आहेत.राजकीय दबावामुळे सराईत गुन्हेगाराप्रमाणे घाई घाईने गेल्या काही महिन्यातच तडीपार करण्यासाठी पुरक गुन्हे दाखल करुन रेकॉर्ड तयार केले. यापुर्वीची पोलीस डायरी तपासल्यास सरोज देशमुख यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य सुद्धा केले आहे. त्या शांतता कमेटी उमरखेड पोलीस स्टेशनच्या सात वर्ष अध्यक्षा होत्या.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त जातीय दंगली ह्या उमरखेड येथे घडल्या त्यामध्ये सरोज देशमुख यांनी दोन समाजामध्ये मध्यस्थी करुन अनेकवेळा भांडणी मिटविल्या त्यामुळे त्या जातीय दंगली कशा घडवू शकतात.
देशमुख यांच्यावर तडीपारीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे परिसरातील अनेक महिलांच्या मनामध्ये भय-भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे यापुढे सामाजिक कार्य करण्यासाठी घराच्या बाहेर न पडण्याचा निर्णय अनेक महिलांनी घेतल्यामुळे महिलावर मोठा अन्याय झाल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. शासनाने आपली पूर्णपणे चौकशी करून फेर अर्जाचा विचार करावा व दिलेला आदेश हा रद्द करावा व सरोज देशमुख यांचेपासून कोणत्या समाजाला धोका आहे हे स्पष्ट करुन त्यांना लेखी समज द्यावी.त्याच प्रमाणे यवतमाळ, हिंगोली, नांदेड या तिन जिल्ह्यामधूनचा तडीपारीचा आदेश रद्द करुन महिलांना भयमुक्त न्याय देण्यात यावा अशी मागणी जगदीश नरवाडे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावेळी उपस्थित जगदीश नरवाडे, विजय सुर्यवंशी, श्रीकांत राऊत, भीमराव पाटील चंद्रवांशी, ऍड इंगळे, ऍड शिवराम कापशे, बालाजी पाते, चंद्रशेखर देवसरकर, विठल कदम, पवन वानखेडे . हे उपस्थित होते.