महागांव/जिल्हा परिषद खडका शाळेत ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लतीफ शेख विशेष प्रतिनिधी यवतमाळ.
महागांव तालुक्यातील आदर्श उपक्रमशील व अनेक पुरस्कार प्राप्त तसेच ‘मुख्यमंत्री माजी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानातील सहभागी शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाबासाहेब नाईक विद्यालय येथे श्री विजयराव देशमुख, सोसायटी कार्यालय येथे अध्यक्ष श्री प्रदीपराव देशमुख ,पशुवैद्यकीय दवाखाना येथे उपसरपंच श्री दत्तराव कदम, ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंचा सौ कमलबाई देशमुख, जिजाऊ ज्ञान मंदिर येथे श्री श्रीकांत देशमुख, जिल्हा परिषद शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत समारोपीय कार्यक्रमात महादिप परिक्षेतील तालुकास्तरीय १०विद्यार्थी, मुलींची लंगडी व कबड्डी केंद्र स्तरिय संघ, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धेतील सर्व विजेते विद्यार्थी , खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा विजेते विद्यार्थी या सर्वांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व नोटबुक देऊन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीने नवोदय, स्कॉलरशिप ,महादीप परीक्षेचे अतिरिक्त वर्ग व अभ्यास घेणाऱ्या सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार केला. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री गजानन भामकर व शिवतेज हॉटेलचे मालक श्री दिनेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही, नोटबुक,पेन ,कलर पेन्सिल, उजळणी चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप शिंदे यांनी केले तर मुख्याध्यापक श्री राहुल नागरगोजे यांनी आभार मानले. या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, सोसायटी ,अंगणवाडी, बाबासाहेब नाईक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा,शिक्षक, कर्मचारी, पदाधिकारी, गावकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.