उमरखेड /मुळावा येथील ग्रामपंचायतची अविश्वासाची विशेष सभा संपन्न
उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे आज दिनांक 9 10 2023 रोजी दुपारी दोन वाजता मुळवा ग्रामपंचायतची अविश्वासाची विशेष सभा संपन्न झाली मुळावा ग्रामपंचायतच्या बारा सदस्यांनी 3 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयात अर्ज करून सरपंच सौ ललिता रामराव जामकर मुळावा यांचे विरुद्ध अविश्वासाच्या ठरावाची नोटीस दिली होती त्यानुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 प्रमाणे विशेष सभा घेण्यात आली विशेष सभा ही वेळेवर घेण्यात आली त्याला ग्रामपंचायतीचे एकूण 15 सदस्य हजर होते तहसीलदार देऊळगावकर साहेब यांनी अविश्वासाचे मुद्दे विद्यमान सरपंच ललिता जामकर यांना वाचून दाखवले व त्यांनी ते सर्व मुद्दे व आपला प्रतिवाद केला नंतर मतदानासाठी सरपंचाच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमताची आवश्यकता असते ग्रामपंचायत मुळावा येथील 15 सदस्या पैकी 12 सदस्यांनी अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे विद्यमान सरपंच ललिता जामकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत करण्यात आला असे निवडणूक अधिकारी श्री देऊळगावकर साहेब यांनी जाहीर केले या कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रामपंचायत चे सचिव आढागळे साहेब सर्व सदस्य व उमरखेड येथून आलेले कर्मचारी उपस्थित होते वसंत नगर (पोफाळी) पोलीस स्टेशनचे ठाणेदार ढोमणे साहेब व त्यांची टीम चोख बंदोबस्तासाठी उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट सुहास खंदारे पोफाळी सर्कल प्रतिनिधी उमरखेड