अर्धापूर पोलीस स्टेशन तर्फे शांतता कमिटीच्या बैठकीत उप विभागीय अधिकारी पोलीस गौहर हसन अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल
अर्धापूर : आगामी काळात येणारे सार्वजनिक उत्सव एकोप्याने आणि आनंदाने साजरा करा असे प्रतिपादन उप विभागीय अधिकारी पोलीस गौहर हसन यांनी दि.13 सप्टेंबर रोजी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत
पुढील काळात असणाऱ्या गणपती उत्सव, पोळा आणि ईद-ए-मिलादुन्नबी उत्सवा निमित्य पोलीस प्रशासनातर्फे या शांतता समिती बैठकीचे आयोजन अर्धापूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आले होते. यावेळी गणपती मंडळाना लोखंडी मंडपाचे निर्माण करू नये, रीतसर मीटर घेऊन विज घ्यावी. उत्सवा दरम्यान विविध समाजपयोगी उपक्रम राबवावे, डीजेचा वापर शक्यतो टाळावा, सामाजिक भावना दुखावतील नाही याची दक्षता घ्यावी, कायद्याचे उल्लंघन करू नका अशा अनेक विविध विषयावर मार्गदर्शन गौहर हसन यांनी केले. मा गोहर हसन यांनी संबंधित गणपती मंडळींच्या सर्व सदस्यांना सूचना दिले की आपण कोणत्या ही धर्माला ठेच पोचू नाही सर्वांना विनंती केले ,यावेळी उपस्थित अर्धापूर तहसीलदार उज्वला पांगारकर मॅडम अर्धापूर नगर पंचायत चे मुख्यधिकारी सेलेश फडसे अर्धापूर नगर अध्यक्ष कानोडे उप अध्यक्ष मुसव्वीर खतीब साहेब महावितरण चे अधिकारी शेख सर पंचायत समिती चे अधिकारी आणि अर्धापूर नागरीचे सर्व नगर सेवक सर्व पत्रकार शहर व तालुक्यातील तांदमुक्तीचे सर्व अध्यक्ष पोलीस पाटील अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के सर उपस्थित होते