हिमायतनगर /कारला(पि.)येथील महिलांची दारु बंदी साठी थेट पोलीस स्टेशन ला धाव.
दारु बंद नाही झाल्यास थेट भोकर, व नांदेड येथील पोलीस अधिकारी यांच्याकडे आर्ज करणार…. डाॅ. गफार तंटामुक्ती तालुका अध्यक्ष
हिमायतनगर तालुक्यातील कारला(पी) येथे दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील महिला शेतात रोज मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करून आपल्या संसाराचा गाडा चालवतात पण या अति दारु विक्रिने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने व तसेच शाळा परिसर देवस्थान परिसरात घान करुन सर्वसाधारण लोकांना होणार्या त्रासाला कंटाळून आज दि. 11 सप्टेंबर रोजी येथील महिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठून पो. निरिक्षक भुसनुर साहेब यांना सर्व हकीकत सांगीतली व साहेबांना कारला गावातील दारु बंद करण्याची विनंती केली पो. निरिक्षक भुसनुर साहेब यांना अर्ज देउन दारु विक्री करणारे यांच्यावर कार्यवाही करुन कारला गावातील दारु ही कायम स्वरूपी बंद करावी अन्यथा आम्ही थेट भोकर व नांदेड येथील पोलीस अधिकारी यांना तक्रार अर्ज करणार अशी मागणी कारला येथील महिलांनी केली पो. निरिक्षक भुसनुर साहेब यांनी कारला ( पी) येथील बीट जमादार राठोड साहेब यांना तात्काळ दारु विक्री करणारे जे कोणी आसतील त्यांना माझ्या समोर हजर करण्याचे आदेश दिले व महीलांना तुम्ही काळजी करू नका मी दारु विक्री करणारे जे कोणी आसतील दारू बंद करण्याचे आदेश देणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी गावातील महिला …. आशाताई गोखले, पार्वतीबाई ढाणके , वंदना गाडेकर, जयश्री ताई घोनशेटवाड, सुमनबाई कांबळे, लक्ष्मीबाई कांबळे व ग्यानबा ईठेवाड ,केशव रासमवाड दत्ता कदम,रामराव पाटिल कदम इतर महिला उपस्थित होत्या.
मुख्य संपादक. एस.के. चांद यांची बातमी