ताज्या घडामोडी

उमरखेड / पुरातन परजना महादेव मंदीराची विकासाच्या दिशेने वाटचाल

उमरखेड / पुरातन परजना महादेव मंदीराची विकासाच्या दिशेने वाटचाल

गावकऱ्यांचा पुढाकार.

उमरखेड तालुका पतिनीधी: संजय काळे

निसर्गरम्य वातावरणात माळटेकडीवर वसलेल्या परजना येथील पुरातन महादेव मंदीराची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे . पंचक्रोषीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परजना ब्राम्हणगाव शिवेवरील पुरातन हेमाडपंती शिवमंदिराच्या व निसर्गरम्य परिसराच्या विकासासाठी मागील वर्षी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन तथा कृषी शास्त्रज्ञ डॉ. विजयराव माने यांच्या कडून विज पाणी पुरवठा व्यवस्था माळरान परीसरात वृक्षारोपण तसेच आमदार नामदेव ससाणे ,जि.प . बांधकाम सभापती राम देवसरकर यांच्या निधीतून सभागृहाचे काम करण्यात आले . गावकऱ्यांच्या पुढाकाराने महादेव मंदीर ट्रस्टची निर्मिती करून संस्थानाच्या विकासाचा ध्यास घेतला आहे . देणगी रुपाने मिळालेल्या पैशातून विकासाला गती येत आहे . संपूर्ण श्रावण महिनाभर भजन किर्तन असे धार्मिक कार्यक्रम येथे राबविले जातात . शिवपार्वतीची जोडीने दगडी मुर्ती असलेल्या या ठिकाणी चैत्र महिन्यात शिव पार्वतीचा विवाह लावला जातो . महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते . पूर्वीच्या काळी उजाड माळरान असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आल्याने निसर्गरम्य शिवालयाकडे दिवसेंदिवस भाविक आकर्षित होत आहेत.डॉ.विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राम्हणगाव कडून 1000 वृक्ष लावण्यात आलेले असून माने यांचेकडून 125000 रुपयाची देणगी देऊन परिसर पर्यटनाच्या उद्देशाने प्रयत्न करत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *