ताज्या घडामोडी

औंरगाबाद येथील पांढरे वादळ (महामोर्चात) लाखोच्या संख्येने  उपस्थित रहावे – गणेश राठोड

औंरगाबाद येथील पांढरे वादळ (महामोर्चात) लाखोच्या संख्येने

उपस्थित रहावे – गणेश राठोड

 

 

प्रतिनिधि:- सर्व बंजारा समाज व सर्व विमुक्त भटके बंधू भगिनींना आव्हान करण्यात येते की, विमुक्त व भटक्या जाती आणि जमातींना दिलेले आरक्षण आज धोक्यात आलेले असून ते वाचविण्यासाठी आम्हाला सर्वस्व पणाला लावून लढा देण्याची आवश्यकता आहे आमच्या विमुक्त जाती जमातीच्या प्रवर्गात जी बोगसगिरी सुरू आहे ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. बोगसगिरी करणारे बोगस उमेदवार जे गैर मार्गाने खोटे पुरावे जोडून बोगस दाखले घेणारे बोगस राजपूत भामटे तसेच चिरीमिरी घेऊन बोगस दाखले देणारे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना त्यांची चौकशी करून कारवाई करण्यासाठी तपास समिती म्हणजेच एसआयटीची नेमणूक व्हावी व दोषीवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी यासाठी सरकारला जागे करण्यासाठी संभाजीनगर येथे लाखोच्या संख्येने विमुक्त जाती जमातीचे प्रतिनिधी सह विविध संघटनेनाने लढा उभारला असून या सरकारला जागे करण्याचे काम आणि आपल्या हक्काचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी लाखोच्या संख्येने 23ऑगस्ट 2023रोज बुधवारला संभाजीनगर ( औंरगाबाद) ला होत असलेला पांढरे वादळ महामोर्चात सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट करावी याकरिता गोर सेनेचे तालुका अध्यक्ष श्री गणेश राठोड यांनी आव्हान केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *