महागांव -/ तिवरंग येथे शेतकऱ्याची झाडाला गाळफास घेऊन आत्महत्या
महागाव तालुक्यात दिनांक २१ व २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीने शेतीचे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
या झालेल्या नुकसानीमुळे तालुक्यातील तिवरंग येथील शेतकऱ्यांने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली नामदेव संभाजी वाघमारे (वय ५२) राहणार तिवरंग असे आत्महत्या केलेले शेतकऱ्याचे आहे..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी नामदेव संभाजी वाघमारे यांच्या शेतीचे व शेतीपिकाचे ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे या आर्थिक विवंचनेत शेतकऱ्यांनी शेतातील आंब्याचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांचे निदर्शनास आली
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली, मृतक शेतकऱ्याचे पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलं आहेत.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख