ताज्या घडामोडी

जि.प.उच्च प्राथ.मराठी शाळा, चिल्ली ई. केंद्र फुलसावंगी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद, नवोदितांचे स्वागत व सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न

जि.प.उच्च प्राथ.मराठी शाळा, चिल्ली ई. केंद्र फुलसावंगी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद, नवोदितांचे स्वागत व सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न

दि.07/08/2023 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, चिल्ली ई. येथे माहे जुलै 2023 ची शिक्षण परिषद, केंद्रात नव्याने आलेल्या नवोदित शिक्षकांचे स्वागत व सेवानिवृत्त झालेल्यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.शाळा, चिल्ली ई. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.माधव रणमले हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गोपाल कटकमवार, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, फुलसावंगी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.अमोल जाधव हे हजर होते.

सेवानिवृत्त झालेले सत्कारमूर्ती महागावचे माजी गटशिक्षणाधिकारी श्री.मारोती मडावी, माजी केंद्रप्रमुख श्री.बबनरावजी कोरके व माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.रामकृष्ण बगाडे हे होते. या त्रिमूर्तीचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.

तत्पूर्वी केंद्र फुलसावंगीची शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. श्री.माधवराव काळे यांनी इंग्रजी विषयाचे अभ्यासक्रमातील व जीवनातील स्थान यावर सखोल मार्गदर्शन केले तर बीआरसी चे विषय साधन व्यक्ती श्री.लुकेश लोखंडे यांनी सीआरजी ग्रुप तयार करून एकमेकांच्या साह्याने केंद्रात कशाप्रकारे गुणवत्ता सुधारणा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद पार पडल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने केंद्रात नव्याने रूजू झालेल्या सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यानंतर सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्याला आरंभ करण्यात आला. तिनही सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विनोद कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री.अमोल जाधव यांनी केले. शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गोपाल कटकमवार, जिल्हा परिषद शाळा दगडथरचे सहाय्यक शिक्षक श्री.ईश्वर थडके, आणि दगडथर शाळेचे सहायक शिक्षक श्री माधवराव काळे सर,JSPM विद्यालयाचे मुख्याध्यापक , जि.प.उर्दू शाळा फुलसावंगीचे मुख्याध्यापक श्री.सय्यद जाकीर यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच तिनही सत्कारमूर्तींनी आपल्या संपूर्ण कारर्गिदचा आढावा सादर करत कशाप्रकारे सेवा केली याबद्दल सविस्तर अशी माहिती देत मार्गदर्शन केले. आणि फुलसावंगी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अमोल किसनराव जाधव यांचे कार्य पाहून त्यांची तळमळ पाहून त्यांचा सुद्धा याप्रसंगी या त्रिमूर्तींनी सत्कार केला.या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिल्ली चे सर्व शिक्षक , मुख्याध्यापक व फुलसावंगी चे सर्व शिक्षक चिंचोली शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.सचिन गोरे सर शाळा फुलसावंगी यांनी केले.

 

महागाव विशेष प्रतिनिधी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *