ताज्या घडामोडी

महागांव / आठव्या दिवशी अंबोडावासी यांच्या साखळी उपोषणाची सांगता.

महागांव / आठव्या दिवशी अंबोडावासी यांच्या साखळी उपोषणाची सांगता.

सात दिवसात विद्युत वितरणाने मागणी केली पुर्ण.

 

 

मागील आठ दिवसापासून अंबोडावासी यांच्या सुरु असलेल्या साखळी उपोषणाची अखेर सांगता करण्यात आली आहे. तहसील कार्यालयासमोर अंबोडा येथील गावकरी उपोषणाला बसल्याने महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला होता.

गावकऱ्यांची अत्यंत रास्त मागणी असताना विद्यमान आमदार नामदेव ससाणे तातडीने उपोषणकर्ते यांची मागणी पूर्ण करू शकले नाही. त्याचाच फटका गावकऱ्यांना बसला असून अखेर आठ दिवसांनंतर उपोषणकर्ते आणि महावितरण विभागाच्या अधिकारी यांच्याशी चर्चेने तोडगा काढण्यात आला. उपोषण दरम्यान केलेली मागणी पूर्णत्वास जात असून काम अंतिम टप्प्यात असल्याचा विश्वास गावकऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे उपोषणकर्ते गावकरी यांनी उपोषण मागे घेतले आहे. त्यावेळेस गावातील सरपंच, समस्त नागरीक, सह राजकीय क्षेत्रातील किसनराव वानखेडे, साहेबराव पाटील, रितेश पुरोहीत, निलेश नरवाडे, व अनेकांनी उपस्थिती दर्शवली.

विजेच्या बिलाचे चटके सोसत असलेल्या अंबोडा येथील गावकऱ्यांना महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा सामना करावा लागत आहे. मागील महिन्याभरापासून विजेअभावी ग्रामस्थांचे हाल झाले. विद्युत तंत्रज्ञ मुख्यालयी हजर राहत नसल्याने विजेचा अधिक खोळंबा होत आहे. जीर्ण होत चाललेले विद्युत तार मृत्यूस आमंत्रण देत असून विजेचा तासनतास बत्ती गूळ राहत असल्याने गावकरी संतप्त झाले. महावितरण कार्यालयाच्या हुकूमशाही कारभार विरोधात गावकऱ्यांनी वज्रमूठ बांधत तहसील कार्यालय समोर साखळी उपोषणाचे हत्यार हाती घेतले. जो पर्यंत काम व मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही यावर गावकरी ठाम असल्याने महावितरण सह विधानसभेचे आमदार यांचा गोंधळ उडाला. अधिकारी यांनी उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी यात अपयशी ठरले. गावकऱ्यांनी अनेक वेळा विजेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महावितरण कडे दाद मागितली होती त्यावेळी मात्र महावितरणने प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे गावकरी यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. ( प्रती )

 

 

उमरखेड विधानसभेतील अंबोडा येथील ग्रामस्थ आठ दिवसापासून उपोषणाला बसले याचे फारसे गांभीर्य विद्यमान आमदाराने घेतले नाही. आमदाराने उपोषणातील मागण्या खरंच मनावर घेतल्या असत्या तर महावितरण चा बुरखा फाडू शकले असते.आणि रातोरात ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा काढू शकले असते. परंतु विधानसभेतील एखाद्या गावाचे ग्रामस्थ आठ दिवस उपोषणाला बसत असतील तर विद्यमान आमदार यांची निष्क्रिय कार्यप्रणाली उघड होते.

महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *