महागांव तालुक्यात ३३दिवस होता विज पुरवठा बंद, शेतकऱ्यांसह जनावरांचे हाल.
(संतप्त शेतकऱ्यांचा जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात ठिय्या)
मुख्य संपादक = एस.के.चांद यांची बातमी
महागाव:-सलग ३३दिवस कृषी पंपाचा विद्युत पुरवठा बंद असल्याने शेतात असलेल्या पिकाला पाणी कसे द्यायचे ,जनावरांना काय पाजायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असतांनाच हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन आधार संघर्ष समितीने महावितरणच्या कार्यालयातच ठिय्या मांडल्याने अखेर तीन तासानंतर शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळित झाला.
महागाव तालुक्यातील आमनी, पिंपरी,मुडाणा, मोरथ,उटी,कलगाव व इतर अनेक गावांत मागील ३३दिवसांपासुन महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित होता ऐन पावसाळ्यात वीज नसल्याने शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाणी कसे द्यायचे ,आपल्या जनावरांना पिण्याचे पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती.याबाबत वारंवार महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलुन सुद्धा काहिच उपाययोजना केल्या जात नसल्याने अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनी जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात महाविरतणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत जो पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत सुरू केल्या जात नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भुमिका आंदोलकांनी घेतल्याने महावितरणच्या अधिकारी व आंदोलकांमध्ये वाद निर्माण झाला होता.शेतकऱ्यांनी तीन तास ठिय्या आंदोलन केल्याने अखेर आंदोलकांच्या भुमिकेसमोर महाविरतणच्या अधिकाऱ्यांनी नमते घेत विद्युत पुरवठा अखंडित पुरविण्याचे आश्वासन दिले परंतु जो पर्यंत विज पुरवठा सुरू होणार नाही तो पर्यंत उठणार नसल्याचा निर्णयावर शेतकरी ठाम असल्याने अखेर तीन तासानंतर विद्युत पुरवठा पुर्ववत चालु करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.याआंदोलनात जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे,बापुराव देशमुख(आमनी सोसायटी अध्यक्ष),वासुदेव नेवारे (संचालक बाजार समिती),सुनिल राऊत,नारायण राठोड दिलीप गौलकर पंडित पवार सुरू खोषे गणेश राऊत ,पांडुरंग राऊत,अविनाश राठोड,अमोल नरवाडे,पांडुरंग राऊत संतोष भरवाडे (अंबोडा) अमोल वानखेडे धनंजय कांबळे असलम शेठ सुरय्या समाधान वाघ विशाल हिंगमिरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.