ताज्या घडामोडी

वन रँक वन पेन्शन” साठी माजी सैनिकांची उमरखेड तहसील कार्यालयवर निदर्शन

वन रँक वन पेन्शन” साठी माजी सैनिकांची उमरखेड तहसील कार्यालयवर निदर्शन

 

केंद्र सरकारने लागू केलेल्या “वन रँक वन पेन्शन” मध्ये अनेक त्रुटी आणि विरोधाभास आहे तो दूर करून सैनिकांना वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी तालुका माजी सैनिकाच्या वतीने तहसील कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली यावेळी तहसीलदार उमरखेड यांना निवेदन देण्यात आले.

देशातील सर्व माजी सैनिक संघटनाच्या माध्यमातून सोमवारी सकाळी नवी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व वन रँक वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळण्यासाठी तालुकास्तरा वर माजी सैनिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे तालुकास्तरावर तहसीलदारांना निवेदन देऊन माजी सैनिकांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या वतीने ओ आर ओ पी टू या संदर्भात माजी सैनिकांवर केंद्र सरकारने केलेले अन्यायाच्या विरोधात जंतर-मंतरवर दिल्ली येथे दिनांक २० फेब्रुवारी२०२३पासून चालू असलेल्या अनिश्चितकालिन धरणे प्रदर्शनाला समर्थन देणे व केंद्र सरकारने जवानांना न्याय देणे याबाबत मा.राष्ट्रपती, मा. प्रधानमंत्री, मा.संरक्षण मंत्री, मा. जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्याकरिता तहसीलदार उमरखेड यांचे वतीने भागवत साहेब यांनी निवेदन स्वीकारले .यावेळी विवेक वि मुडे माजी सैनिक जिल्हा अध्यक्ष, पिलवंड सर तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली उमरखेड तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

उमरखेड तालुका प्रतिनिधी विजय कदम

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *