बाजार समितीच्या निवडणूक शिवसेनेने घेतली आढावा बैठक.
महागाव/शिवसेना कार्यालय महागाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली निवडणूक लढाऊ इच्छिणाऱ्यांनी नावे शिवसेना कार्यरत महागाव येथे नोंदविण्याचे आव्हान करण्यात आले बैठकीमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.एन चव्हाण, नगरपंचायत चे गट नेते रामराव पाटील नरवाडे व शिवसेना तालुका प्रमुख राजु राठोड यांनी बोलताना मार्गदर्शन केले.
महागाव तालुक्यातील मतदारांशी संवाद सतत संपर्कात असल्यामुळे पुर्ण ताकदीनिशी बाजार समितीच्या निवडणूका लढवण्याची तयारी असल्याचे डॉ बी. एन. चव्हाण व रामाराव पाटील नरवाडे यांनी सांगितले.ही बैठक डॉ.बी.एन. चव्हाण,रामाराव पाटील नरवाडे, रामचंद्र आखरे,राजु राठोड, रामचंद्र तंबाखे, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.या बैठकीत शिवसेनेचे आजी _माझी प्रमुख पदाधिकारी महागाव तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते