ताज्या घडामोडी

भोकर तालुक्यातील मातुळ,रायखोड,चिदगिरी, पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत कमात भ्रष्टाचाराचा आरोप ; सोहेल बसणार उपोषणस

भोकर तालुक्यातील मातुळ,रायखोड,चिदगिरी, पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत कमात भ्रष्टाचाराचा आरोप ; सोहेल बसणार उपोषणस

 

प्रतिनिधी/ नांदेड

भोकर तालुक्यातील मौजे मातुळ,रायखोड, चिदगिरी,पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगात केलेली कामे हे बोगस व निकृष्ट झाले असून पुर्ण काम झाल्याचे कागदोपत्री सादर करून लाखोची बिले उचलण्यात आली असल्याचा आरोप कर्ते अब्दुल सोहेल यांनी आपल्या निवेदनामध्ये केला आहे.ग्रामसेवक ह्या गटविकास अधिकारी यांच्या जातीच्या असल्याने ग्रासेवकांना ग्रामपंचायतीचा पदभार देताना जातीने लक्ष घालून वरील चारही गावाचा पदभार एकाच ग्रामसेवका कडे देण्यात आला. वरिल चारही ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामा संदर्भात अनेकांनी अनेक वेळा तक्रारी व निवेदने देऊन सुध्दा गटविकास अधिकारी या प्रकरणाकडे काणाडोळा करत असल्याने ग्रामसेवकाचे मनोबल आणखी वाढत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशा भ्रष्ठ ग्रामसेवकांना ते पाठिशी घालत असल्याने तालुक्यात भ्रष्ठ कामा विरोधात जाऊन तक्रारी निवेदन देणाऱ्या ग्रामस्थांना ” बघून घेतो ” सारख्या धमक्या देऊन पैशाचे आमिष दाखवून खोटे गुन्हे दाखल करण्यासारखे प्रमाण सध्या वाढले आहे.वरील चारही ग्रामपंचायत अंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून अब्दुल सोहेल यांनी भोकर तालुक्यातील मौजे मातुळ.रायखोड.चिदगीरी.पोमनाळा इत्यादी ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातील आलेल्या निधी मध्ये गावात दलित, वस्ती सह , जल शुध्दीकरण यंत्रकाम,गावात नाली बांधकाम, सी सी रोड, पाणी पुरवठा, समाज मंदिर, सोलार यंञ बसवने, यासह अनेक कामात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगमत करून ? गावातील आदी कामे बोगस व निकृष्ट दर्जाची करून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन आदी भ्रष्ट कामाची तत्काळ उच्चस्तरिय चौकशी करून चौकशीचा अहवाल देण्यात यावे अशी मागणी केली होती पण आज प्रियांत कार्यवाही ना झालियामुळे अब्दूल सोहेल अब्दूल मजीब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद समोर उपोषणास बसणार

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *