राजकारण

महागाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची आढावा बैठक.

महागाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची आढावा बैठक.

 

महागांव विशेष प्रतिनिधी / शेख सलमान

 

महागाव : येत्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वमहा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे . यानिमित्त विविध विषयावर चर्चा करण्याकरिता महागाव येथे शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली . येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , कृषी उत्पन्न बाजार समिती सह इतर निवडणुकांच्या अनुषंगावर सर्व पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा करण्यात आली . या आढावा बैठकीला मुख्य अतिथी माजी क्रीडामंत्री संजय देशमुख , जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे , उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे , उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे , युवासेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे , महागाव तालुकाप्रमुख प्रमोद भरवाडे , तालुका संघटक रवींद्र भारती , तालुका समन्वयक ओम देशमुख , युवासेना तालुका प्रमुख सुशील गावंडे , शिवसेना शहरप्रमुख तेजेश नरवाडे , शहरसंघटक अनिल गव्हाणे , युवासेना शहरप्रमुख ओम कुसंगवार , सुदाम खंदारे , सुरेश देशमुख , अशोक तुमवार , सतीष नरवाडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *