यवतमाळ /आज उमरखेड येते संविधानाचा जागर व्हावा संविधान गौरव जागर सोहळा संपन्न.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 395 कलमी जाहीरनामा लिहून देशातील प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या तत्त्वा प्रमाणे वावरण्याचा अधिकार भारतीय संविधानाने बहाल करून प्रत्येक मानव जातीला समान न्यायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून देशातील प्रत्येक नागरिकाने संविधानाचा जागर व्हावा या उद्देशाने काम करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड.संतोष आगलावे यांनी उमरखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय संविधान गौरव सोहळा “”हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड संतोष आगलावे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मदीप काळबांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजयराव खडसे, शहराध्यक्ष एस के मुनेश्वर ,डी के दामोधर जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी , ॲड.शंकर मुनेश्वर, गोपाल अग्रवाल, किशोर भवरे,चंद्रमणी सावतकर, सम्मद खान पठाण ,युसुफ भाई ठेकेदार, इत्यादीउपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्रिसरण पंचशील प्रदान करून यशवंत काळबांडे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमात माजी आमदार विजयराव खडसे,डी के दामोधर, ॲड.शंकर मुनेश्वर, मयुरी दामोधर, प्रियंका वाढवे यांनी सुद्धा आपले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस के मुनेश्वर यांनी केले तर सूत्रसंचालन विजय सिंगनकर व आभार प्रदर्शन सुधाकर कांबळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेसाहेब पंडित ,पी एल आठवले ,दादाराव आठवले ,दिगंबर श्रवले,मधुकर धुळे, कानबा ढोले ,बाळासाहेब सावंतकर, पांडुरंग वंजारी ,मेजर मिलिंद बर्डे ,मारोतराव दिवेकर, डॉ. नरेंद्र कांबळे, सारनाथ रोकडे, सुभाष खंदारे, आगमे ,भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल तथा समस्त शहरवासीयांनी परिश्रम घेतले
तालुका प्रतिनिधी सुभाष वाघाडे