भारत जोडो पदयात्रेच्या प्रचार, प्रसार व अद्यावत माहितीसाठी अर्धापूर तालुका सोशल मीडिया सरसावली
नांदेड /एस.के.चांद यांची रिपोट
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काढलेली भारत जोडो पदयात्रा दिनांक 11 रोजी अर्धापूर तालुक्यात आगमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, अर्धापुर तालुका व शहर काँग्रेस कमिटी, नगरपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रतिनिधी, नगरसेवक व कार्यकर्ते यांच्यासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांत मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी आपापल्या परीने जनसामान्यांना या पदयात्रेत सहभागी होण्याचे आव्हान करीत आहेत. त्यासाठी ग्रामीण व शहरी भागात कॉर्नर बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यांच्यासोबतच अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटी सोशल मीडियाचे प्रमुख, निस्वार्थपणे काँग्रेस पक्षाची सेवा करणारे शेख मकसूद यांनीदेखील सोशल मीडियावर भारत जोडो पद यात्रेचे विविध ऑडिओ, व्हिडिओ क्लिप व फोटो सतत पोस्ट करून यात्रेची अद्यावत माहिती जनसामान्यांना देत आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेविषयी जनसामान्यांमध्ये कुतूहल निर्माण होत आहे.