ताज्या घडामोडी

महागांव (दौ .) काळी येथे रोपवाटिकेच्या कुंपण कामात गैरव्यवहार कंत्राटदाराचा मनमानी कारभार चव्हाट्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी गप्प कसे ? 

महागांव (दौ .) काळी येथे रोपवाटिकेच्या कुंपण कामात गैरव्यवहार कंत्राटदाराचा मनमानी कारभार चव्हाट्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी गप्प कसे ?

 

मुख्यसंपादक /एस.के. चांद यांची रिपोट

 

महागाव : तालुक्यातील काळी ( दौ . ) वनपरिक्षेत्रात रोपावाटिकेला कुंपण लावण्यात आले . मात्र या कामात प्रचंड गैरव्यवहार होत असून , वनपरिक्षेत्र अधिकारी गप्प आहे . त्यामुळे या कामाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा वाढली आहे . पुसद वनविभागांतर्गत येणाऱ्या महागाव तालुक्यातील काळी ( दौ . ) वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत रोपवाटिकेचे काम करण्यात येत आहे . या कामामध्ये प्रचंड गैरव्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे . या रोपवाटिकेला लोखंडी जाळीचे कुंपण लावण्याचे काम प्रगतीपथावर असून , यासाठी छोटे लोखंडी खांब उभारण्यासाठी खड्डे खोदणे आवश्यक होते . मात्र कंत्राटदाराने मनमानी करीत हे खांब खड्डे न खोदता जमिनीवर खडकावर सिमेंट काँक्रीटच्या मालाची लिपापोती करून उभे करण्याचा सपाटा लावला आहे . त्यामुळे हे काम किती निकृष्ठ दर्जाचे होत आहे , याचा प्रत्यय ” येत आहे . निकृष्ठ दर्जाचे काम होत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याठिकाणी जावून काम पाहण्यासाठी सवड नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या रसदेमुळे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत . त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करून शासनाच्या निधीचा अपव्यय थांबवावा , अशी मागणी होत आहे .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *