घाटंजीत संत नामदेव महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आलीय..
कार्यक्रमात समाजातील विवीध क्षेत्रातील कतृत्ववान व्यग्ती सत्कारा सोबतच वृक्ष वाटप,प्रगतशिल शेतकरी, शैक्षणिक गुणवताप्राप्त यांचाही सत्कार संपन्न
घाटंजी जलाराम मंदीर येथे संत नामदेव महाराज जयंती शिंपी समाज तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. घाटी येथिल संत नामदेव महाराज चौक येथे सकाळी ९ वाजता काकड आरती व वारकरी भजन करुन भजणी मंडळाचा शाल श्रीफळ देऊन यथोच सत्कार करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मुख्य कार्यक्रम जलाराम मंदीर येथे रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी वेषभुषा स्पर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील समकालीण तिन पि. एस. आय व्यग्तींचा सत्कारा सोबतच या कार्यक्रमात समाजातील१० वी १२ वी व ईतर गुणवंत प्राप्त विद्यार्थी सत्कार ही घेन्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य म्हणजे संत नामदेव महाराज चरित्रावर राष्ट्रनिर्माण विचारधारा संच व ग्रामगिताचार्य गजेंद्र ढवळे सर यांचे व्याख्याण यातुन संत चरित्र/ कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणुन बाबारावजी कीर्तीवार पि. एस. आय सेवानिवृत्त अधिकारी यवतमाळ, दिनकरराव दमकोंडवार पि. एस. आय.पुसद, यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच अनिल अक्केवार वणी शिंपी समाज अध्यक्ष, कार्यक्रमात पत्रकार संघटना उपाध्यक्ष कज्जुम कुरेशी, संतोष पोटपिल्लेवार, नारायण गटलेवार, अरविंद जाधव यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार कण्यात आला.
घाटंजी तालुका प्रतिनीधी/अरुण जाधव
तालुका शहर प्रतिनिधी/ नारायण गटलेवार