उमरखेड / धानोरा साचलदेव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाचा मनमानी कारभार चालू..
उमरखेड प्रतिनिधी / सुभाष वाघाडे
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धानोरा साचलदेव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाचा मनमानी कारभार चालू आहे कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी गट विकास अधिकारी उमरखेड यांना लेखी स्वरुपात निवेदन दिले आहे पंजाब खांडरे ते बालाजी रोड असा लोकेशन असलेला सीसी रस्ता काही दिवसापूर्वी बांधण्यात आला ते रस्ता एकदम निकृष्ट दर्जाचा असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे तसेच या कामांमध्ये माती मिश्रीत वाळू वापरल्याचा त्यांचा आरोप आहे ग्रामसेवक सदस्यांना कोणत्याही कामाची माहिती देत नाही व अर्वाची भाषेत बोलतो असेही त्यांचे मान्य आहे सदर रस्ता बांधण्याचे कोणतेही इस्टिमेट नसताना देखील हा रस्ता बांधण्यात आला वित्त आयोगातील पैसा गावातील रस्ते नाली लाईट बिल स्टेशनरी इतर गोष्टीवर खर्च करण्यासाठी राखीव असतो परंतु ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारापुढे कोणाचेही काही चालत नाही त्यामुळे सदरील कामाची चौकशी करून ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य रेखा शरद वानखेडे केशव सटवा काळे राधा विठ्ठल काळे यांनी गटविकास अधिकारी उमरखेड यांच्याकडे केली आहे असे न झाल्यास पंचायत समिती उमरखेड येथे उपोषणाचा इशारा दिला आहे