कोटा तांडा येथे अवैध देशी दारू ची खुलेआम विक्री जोमात
मुख्यसंपादक / एस.के. चांद यांची बातमी
हिमायतनगर पोलिसांना वारंवार लिखित तक्रार देऊनही कोटा तांडा येथील अवैध देशी दारू विक्री सुरूच
हिमायतनगर तालुक्यातील कोटा तांडा गावात विना परवाना अवैध देशीदारू भरदिवसा खुलेआम मोठया प्रमाणावर विक्री केली जात आहे. दिवसभर चालू असलेल्या या दारू विक्रीमुळे मध्यपिचा संख्येत मोठी वाढ होऊन गांवकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पोलीस प्रशासन उत्पादन शुल्क अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असे कोटा तांडा परिसरातील नागरिकांच्या तोडून ऐकवयास मिळत आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील कोटा तांडा गावात अवैध देशी दारू जोमात चालु असल्यामुळे कोटा तांडा परीसरातील अनेक लोक व्यसनी लागुन अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे व देशी दारुच्या आहारी जाहारी जाऊन सुशिक्षित वर्ग सुद्धा दारुच्या आहारी जाऊ लागला आहे,
दारु पिऊन रोज बायको लेकरांना मारहाण करणे दारु पिऊन रोड रोमीवो बनुन भांडण तंटा निर्माण करुन सामान्य माणसाला त्रास देणं हे रोजच चालू असल्याचे दिसून येते आहे. तसेच तालुक्यातील बरेच गावांंचे अवैध देशीदारुचे धंदे खुलेआम चालू असल्याचे दिसून येत आहे परंतु याकडे पोलीस प्रशासन उत्पादन शुल्क विभागाचे साफ दुर्लक्ष असल्यामुळे कोटा तांडा येथील ग्रामस्थ सोबत महिलांनी व गावकऱ्यांनी कोटा तांडा येथे सुरु असलेले अवैध देशी दारूचे धंदे तात्काळ थांबवून खुलेआम सुरु असलेली अवैध देशी दारू कायमचे बंद करावेे यासठी हिमायतनर पोलिसांना कोटा तांडा येथील गावकऱ्यांनी सांगितले होते मात्र हिमायतनगर पोलिसांकडून अद्यापही कारवाई करण्यात येत नसल्यामुळे कोटा तांडा येथील नागरिकांकडून तक्रारही देण्यात आली असून ही हिमायतनगर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नसल्याचे
सामान्य माणसाच्या तोंडुन आयकायला मिळत आहे
तालुक्यातील बरेच गावात अवैध देशी दारुचे धंदे जोरदार व जोमात चालु असल्याचे दिसून येत आहे, हिमायतनगर पोलिसांना व उत्पादन शुल्क विभागाला खरच अवैध धंद्याची माहिती नसेल का ? जर माहिती असेल तर मग अवैध धंदे करणार्यावर कार्यवाही करुन अवैध धंदे का बंद करत नाही ? या अवैध धंदे करणाऱ्यांना कोणाची सात असेल असे अनेक प्रश्न नागरिकांमधून बोलल्या जात आहे तसेच कोटा तांडा गावात हि अवैध देशी दारुचे विक्री चड दराने जोमात चालु असल्याने संबंधित पोलीस अधिकारी व उत्पादन शुल्क विभाग अधिकारी यांनी लक्ष देऊन कोटा तांडा येथील सुरु असलेली अवैध देशी दारू कधी बंद करणार असे कोटा तांडा परिसरातील नागरिकांना मधून बोल्या जात आहे, व् तसेच या संदर्भात कोठा तांडा येथील राहिवाशी असलेले अरुण चंद्रु राठोड मार्फत यग्रामपंचायत कोठा तांडा च्या लेटर पेड वरुन समस्त गावकारी यांचे तर्फे हिमायतनगर पोलिस ठाण्यात दि:-24/10/2022 रोजी तक्रार दिली असून या तक्रार चची तत्काळ दखल घेऊन बे कायदेशीर होत असलेली दारू विक्री बंद नाही केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करू अशी माहिती अरुण चंद्रु राठोड यांनी आमच्या प्रतिनिधि ला दिली आहे,