आरोग्य ताज्या घडामोडी

हेल्प फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रायव्हेट दवाखान्यात होणारी लूट थांबून डिलेवरी केली फ्री..

हेल्प फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रायव्हेट दवाखान्यात होणारी लूट थांबून डिलेवरी केली फ्री

अन्नपूर्णा बनसोड शहर प्रतिनिधी उमरखेड

भाविक भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेडच्या उमरखेड येथील युवा ब्रिगेड तालुका अध्यक्ष राजकुमार शिरगिरे व प्रमोद राठोड यांच्या मदतीने उमरखेड येथील प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी पेशंटची 40 ते 50 हजार रुपयांनी लूट होत असताना सदर पेशंट सविताताई रामा सातेगावकर बिटरगाव तालुका उमरखेड येथील आहे त्यांची परिस्थिती अतिशय हलाकीची असल्यामुळे या महिलेस यवतमाळ येथील सरकारी दवाखान्यात ऍडमिट करून कोणताही खर्च न लागू देता फ्री ऑफ डिलिव्हरी सुखरूप करायला लावली त्यामुळे सातेगावकर कुटुंब अतिशय आनंदित झाले उमरखेड येथे शासकीय रुग्णालयात कोणतीही व्यवस्था नाही पालकमंत्र्याच्या निष्क्रिय भूमिकेमुळे अद्याप उपजिल्हा रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सुरू झाले नाही त्यामुळे येथील गरीब महागडा उपचार खाजगी दवाखान्यात घ्यावा लागत आहे भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड यवतमाळ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भाविक भाऊ भगत यांचे प्रयत्नाने यवतमाळ येथील सरकारी दवाखान्यात बोलून या पेशंटची सर्व व्यवस्था अगदी मोफत केली सर्वत्र या हेल्प फाउंडेशनच्या कार्याचे स्वागत होत आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *