क्राईम डायरी

राशनच्या गाडीची माहिती पोलिसांना का दिली म्हणून पत्रकारावर जीव घेणा हल्ला आरोपींना तात्काळ अटक करा व फिर्यादी पत्रकार यांना पोलीस संरक्षण द्या;- मागणी

राशनच्या गाडीची माहिती पोलिसांना का दिली म्हणून पत्रकारावर जीव घेणा हल्ला

 

 

आरोपींना तात्काळ अटक करा व फिर्यादी पत्रकार यांना पोलीस संरक्षण द्या;- मागणी

 

नांदेड / एस के चांद यांची बातमी

 

वसमत शहर पोलीस स्टेशन येथे दि.07.10.2022 रोजी राशन माफियाविरूध्द गुन्हा नोंद कर्णीयची प्रक्रिया चालू आहे. सदर राशन माफिया यांनी अब्दुल सोहेल ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सायंकाळी 5.00 वाजेच्या सुमारास असतांना वाहन क्र.MH-26-BE0412 संबंधीत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे इ.सी. गुन्हा प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. त्याअनुषंगाने बातमी घेण्यासाठी पोलीस स्टेशनाच्या परिसरात उभा होतो. त्याचवेळी आरोपी हे पत्रकार सोहेल यांच्या कडे आले आणि तुम्ही पत्रकार आहेत का असे विचारले, त्यावरून मी त्यांना सांगितले की हो मी पत्रकार आहे. त्यानंतर त्यांनी मला चहा पिण्यासाठी चला म्हणुन ग्रामीण पोलीस स्टेशन समोर कामाक्षी होटल येथे नेले. आम्ही दोघे चहा पिण्यासाठी होटलमध्ये गेल्यावर येथे अरफत कादरी, इकबाल कादरी, रेहमत खान व इतर 5 ते 6 अनोळखी व्यक्ती होते. अरफत कादरी यांनी सांगीतले की, सदर राशनाचे वाहनाची माहिती पोलीसांना का दिली म्हणुन मला शिवीगाळ केली व अरफत कादरी यांनी थापडबुक्यांनी गालात पाठीवर मारून मुक्कामार मारला व जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच माझ्या पोटावर टेबल खालुन गन (शस्त्र) लावले आणि माझ्या हातातील अंगठी वजन अंदाजे 7 ग्रा. घेवुन गेले. सदर प्रकरण चालु असतांना माझ्या हातातील माझे मोबाईल हिसकावुन घेतले. आणि मी म्हणालो की मला फोन दया, मला फोन लावायचे आहे. पण यांनी मला फोन दिले नाही. त्यानंतर मी तेथुन पडुन वसमत येथील ग्रामीण पोलीस स्टेशनात आलो. त्यानंतर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी त्यांच्या वाहनामध्ये बसवुन शहर पोलीस ठाण्यात सोडले. त्यानंतर मी शहर पोलीस स्टेशन वसमत हे मी ज्याप्रमाणे फिर्याद देतो त्याप्रमाणे फिर्याद न घेता देशाचे चौथे स्तभ असलेल्या पत्रकारास न्याय न देता, राशन माफियांना संपुर्ण करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे फिर्याद नोंद करून घेतली. माझ्यावर शहर पोलीसांनी दबावु टाकुन चुकीची फिर्याद लिहुन घेतली आहे. भारतीय संविधानाने मला अधिकार दिलेले आहे की, पत्रकार हा खरी व सत्य बातमी लावु शकतो. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप किंवा अडथळा आणु शकत नाही. मी दिलेल्या अनेक माहितीच्या अधिकारामुळे अनेक जण अब्दुल सोहेल यांना जिवे मारण्याची दाट शक्यता आहे या मुळे संबंधित राशन माफियावर तात्काळ अनेक कलमा द्वारे गुन्हा वाढविण्याची संबंधित अधिकाऱ्यांना आदेश करावे असे निवेदन महाराष्ट्राचे गृहसचिव व महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तसेच पोलीस अधीक्षक नांदेड हिंगोली व अनेक पोलीस अधिकारी यांना ई-मेल द्वारे विनंती केले की तात्काळ पोलीस संरक्षक देण्यात यावे असे निवेदन दिले,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *