महागांव/ आश्रम विद्यालय मुडाणा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान दिले भेट
महागांव प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची बातमी
बंडखोर विद्रोहाचा विस्फोट करणारा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार ऑल इंडिया पँथर सेना अन्याय अत्याचार व भ्रष्टाचारच्या विरोधात सबसे तेज शाखा मुडाणा येथे दि .१० / १० / २०२२ रोजी श्री संत एकनाथ महाराज यांचे मठाजवळील निजधाम आश्रम महाविद्यालय येथे ऑल इंडिया पँथर सेना द्वारे भारतीय संविधान भेट म्हणून देण्यात आले व सर्व शिक्षकांना सूचित केले की नियमितपणे विद्यार्थ्यांना दररोज परिपाठ प्रमाणे भारतीय संविधान चे वाचन व त्यातील कलमा विद्यार्थी विद्यार्थिनींना समजावून व दररोज वाचन करण्यात यावे विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हक्क अधिकार याद्वारे माहिती झाली पाहिजे असे ऑल इंडिया पँथर सेना च्या वतीने सांगण्यात आले पहिलेच आपल्या या भारत देशावर संकट काही विद्रोही पक्षाच्या नेत्यांनी टाकले असून पुढील येणाऱ्या काळात यवतमाळ जिल्ह्यामधील प्रार्थमिक मराठी शाळा ० ते २० पटसंख्या त्या आतील बंद पडण्याच्या मार्गावर असून आताच्या इतिहासासारख्या माहिती अनुसार संविधान भारताचे विद्यार्थी विद्यार्थिनींना समजले पाहिजे असे मुख्याध्यापक व शिक्षकांना सांगितले. संविधान देताना उपस्थित. असलेले शिक्षक वर्ग मुख्याध्यापक सावंत सर. भारत खंदारे सर. मस्के सर.आर.के. सर.राठोड सर. वानखेडे सर.व इतर कर्मचारी हजर होते
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा इथेही भारतीय संविधान भेट देण्यात आली उपस्थित वर्ग शिक्षक मुख्याध्यापक वानखेडे सर रामलाल जाधव सर पी डी राठोड सर आकाश आंबेकर सर नरावाड सर शिंदे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते ऑल इंडिया पँथर सेना शाखा मुडाणा अध्यक्ष , प्रशांत मिलिंद बरडे उपाध्यक्ष , गौतम धूळधूळे सचिव , रवी डिगांबर खंदारे सदस्य , अभय पाईकराव.राहुल बरडे. धम्मदीप कांबळे. विपुल पाईकराव.श्रीकांत लोखंडे. उपस्थित होते निजधाम आश्रम विध्यालय विद्यार्थी संख्या ४५४ व जिल्हा परिषद मराठी शाळा विद्यार्थी पट संख्या ४० ९ .