महागांव/ खडका येथे ७५ महिलांना साडी वाटप देऊन पदमावती पुरोहित यांच्या वाढदिवस साजरा
महागांव /लतीफ शेख यांची बातमी
महागांव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाणारे गाव खडका येथे पाँलीटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक यांची जन्मभूमी श्री.रितेशभाऊ पुरोहित यांनी आपली आई पदमावतीबाई मोहनलालजी पुरोहित यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 24/09/2022 रोजी गावातील ७५ महिलांना साडी वाटप
केले गावातील महिलांनी आई पदमावती मोहनलालजी पुरोहित यांना आयुष्याच्या उदंड शुभेच्छा दिल्या
श्री रितेशभाऊ पुरोहित हे नेहमी आपल्या गावासाठी वेगवेगळे कार्यक्रम घडवण्याचा मार्ग घेत असतात मागील वर्षी ८० गरजू नागरिकांना टीन पत्रे वाटप करून आज ७५ महिलांना साडी वाटप . केले
श्री रितेश भाऊ पुरोहित यांनी या कार्यक्रमासाठी डॉ.राजेंद्र पुरोहित.संचालक बा.ना.सुतगिरणी,सरपंच संदीप कानडे,दत्तराव कदम. महागाव तालुका जि.प्रेसिंग संचालक , रितेशभाऊ पुरोहित,डॉ.संदीप शिंदे,विलास वळसे पाटील,रज्जाक ठेकेदार,संजय वाघमारे, विलास देशमुख, दशरथ मारटकर, अनिल कांबळे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना डॉ.संदीप शिंदे तर आभार प्रदर्शन दत्तराव कदम यांनी केले.