महागाव येथे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संदर्भात अंतर्गत रांगोळी स्पर्धा संपन्न
प्रतिनिधी /एस के शब्बीर महागांव
भारतीय जनता पार्टी महागाव कडून सेवा पंधरवाडा अंतर्गत भाजपा महिला आघाडी व तालुका उपाध्यक्ष संजय चिंतामणी यांच्या पुढाकारातून महागाव येथे आज 20 सप्टेंबर रोजी उमरखेड महागाव विभागाचे आमदार नामदेवरावजी ससाणे साहेब.यांच्या मार्गदर्शनात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
यामध्ये शहरातील महिलांनी व तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा व आत्मनिर्भर भारत सेवा प्रकल्पाचे विविध कलागुण सादर केले यामध्ये स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेड महागाव विभागाचे आमदार नामदेवरावजी ससाने,माजी आमदार राजेंद्रजी नजरधने भाजपा जिल्हा सचिव विलासभाऊ शेबे,माजी जि प सदस्य विलास भुसारे सर,भाजपा तालुका सरचिटणीस योगेश वाजपेयी, अंबादास भिमटे पाटील,तालुका उपाध्यक्ष संजय चिंतामणी,शंकर बावने,भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस जयश्रीताई राठोड,भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष निर्मलाताई सोयाम,नगरसेविका रंजनाताई आडे,नगरसेविका आशाताई शंकर बावने,छायाताई खंदारे,तबसुम बेग,प्रियाताई शिंदे,पुष्पाताई कावळे व महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संचालन नंदूभाऊ कावळे यांनी केले.