आरोग्य क्रीडांगण

रत्नापूर अंगणवाडी शाळेमध्ये पोषण अभियान व गोदभराईसंपन्न..

रत्नापूर अंगणवाडी शाळेमध्ये पोषण अभियान व गोदभराईसंपन्न..

 

परंडा तालुका विशेष प्रतिनिधी/

 

एकात्मिक बालविकास प्रकल्प परांडा अंतर्गत प्रकल्प अधिकारी अमोल चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आनाळा बीट मधील रत्नापूर या गावातील अंगणवाडी क्रमांक 414 व 415 शाळेमध्ये पोषण अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला. आनाळा बीट च्या सुपरवायझर cm लोंढे मॅडम व रत्नपुर गावच्या सरपंच सौ गवळण श्रीराम देवकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार घालून फोडून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

 

आनाळा बीट मधील रत्नापूर, मलकापूर, खंडेश्वर वाडी , कुकडगाव , चिचपुर, हिंगणगाव , वाटेफळ , पांढरेवाडी येथील अंगणवाडी सेविका यांनी विविध प्रकारचे पाककृती मधून पदार्थ बनवून त्यांची उत्कृष्ट रित्या मांडणी करून , गरोदर मातेची ब्लाउज पीस नारळ देऊन ओटी भरण करण्यात आले . रत्नापूर अंगणवाडी शाळेमध्ये पोषण अभियान अन्नप्राशन गोद भराई इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले . 0 ते 3 वर्षाच्या बालकांना आणि गरोदर माता व स्तनदा माता यांना रानभाज्या व आहाराविषयी माहिती देण्यात आली. यावेळी रत्नापूर गावातील आशा वर्कर ताई कांचन देवकर आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बैरागी सर सहशिक्षक झाडबुके सर उपस्थित होते..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *