शिवसैनिकांचे ७०० कि.मी. अंतर पायी पार करून शिवसेना पक्ष प्रमुखाची भेट..
विशेष प्रतिनिधी हदगाव
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका येथील आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक सदस्य असलेल्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य श्री साईराम कनकुंटवार हे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथून ७०० किलोमीटर पायी चालत मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे जाऊन आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे त्यांनी पक्षप्रमुखांना सांगितले .यावेळी आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या सदस्य असलेला श्री संतोष पाटील, श्री महेंद्र गुरव ,श्री सूर्यकांत कडू,श्री रणजीत नरवणकर ,श्री ललित कुमार मुथा , श्री. बाळा परब , श्री चेतन दहीकर इत्यादी सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते..