माजी मुख्यमंत्री यांचे विधानसभा क्षेत्रात लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार इथे ED खामोश :अब्दुल सोहेल
अर्धापूर प्रतिनिधी/सोहेल खतीब शहराच्या विकासासाठी वरील कार्यालयाकडुन शहरामधील विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत. परंतु सदर कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे व आजतागायत करण्यात येत आहे. अर्धापूर शहरातील विविध विकास कामे उदा.सी. सी. नाली बांधकाम, सी. सी. रस्ता बांधकाम, पाणी पुरवठा योजनेचे काम, डंम्पींग ग्राऊडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम, विविध समाजाचे स्मशान भुमीचे कामे तसेच अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील विद्युतपोलचे काम, प्रत्येक वार्डात ठिक-ठिकाणी विनारॉयल्टीचे मुरुम टाकणे, शॉपिंग कॉम्प्लेक्श, दलितवस्तीचे काम इतर ठिकाणी करणे यासर्व कामामध्ये कोटयावधी रूपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. शासनाच्या पैश्याचा अपहार होत असल्याचे दिसुन येत आहे. गोर-गरीबांच्या एक- एकपाई रूपयाचे हिशोब भ्रष्टाचारी लोकांनाकडुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. १) अर्धापूर नगरपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा योजना उन्हाळा सन-२०१६ :- सदर योजनेअंतर्गत शासनाचे रक्कम रूपये ८१,३७,८००/- एवढी रक्कम नगरपंचायत कार्यालय अर्धापूर यांच्याकडे आली होती. मी यापुर्वी सदर कामाची चौकशी करा म्हणुन मा. जिल्हाधिकारी साहेब, नांदेड यांना पत्र दिलेले आहे. पण आजपर्यंत माझ्या अर्जावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. सदर पाणी पुरवठा योजना पुर्णपणे अत्यंत बोगस झालेली आहे. कारण नगरपंचायत कार्यालयाने अर्धापूर येथील ७किमी अंतरावर असलेले जांभरून तलावातुन पाईपलाईनव्दारे पाणी आणण्याचे प्रयत्न केली होती. सदर तलावाचे पाणी आजपर्यंत अर्धापूर शहरातील लोकांना मिळालेले नाही. माझ्या माहितीप्रमाणे सदर काम पुर्णपणे बोगस झालेले आहे. अर्धापूर नगरपंचायत तर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड यांना सन-२०१३-१४ मध्ये दलितवस्ती वाढीव पाणी पुरवठा योजना वर्ग केली होती. याची अंदाजित रक्कम रूपये २,६४,१५,०००/- एवढी आहे. ही योजनासुध्दा अर्धापूर शहरातील दलितवस्तीमध्ये पुर्णपणे बोगस करण्यात आलेली आहे. याच विषयाअंतर्गत मी अनेक कार्यालयात पत्रव्यवहार केला होता. यामध्ये मी असे उल्लेख केलेला आहे की, माझ्याकडे असलेल्या पुराव्यात नगरपंचायत अर्धापूर कडुन २,६४,१५,०००/- रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड यांना वर्ग केलेले होते असे नगरपंचायतचे मुख्याधिकारी चिंचाळकर यांनी दिलेले विनयोग प्रमाणपत्रावर उल्लेख केलेले आहे. आणि मी यापुर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड या विभागत माहिती अधिकार २००५ अंतर्गत नमूद केलेले आहे की, या योजनेसाठी नगरपंचायत अर्धापूर कडुन २,६४,१५,०००/- रूपये मिळालेले माहिती मागितली होती त्यामध्ये यांनी मला दिलेल्या पत्रामध्ये असे जीवन प्राधिकारणशी काहीही संबंध नाही. असे पत्रामध्ये स्पष्ट नमुद केलेले आहे. नाही. व या रक्कमेची प्रशासकिय मान्यताही नाही त्यामुळे ३७.०० लक्ष जास्तीचा खर्चा महाराष्ट्र मोठया रक्कमेचा अपहार झालेला आहे असे दिसुन येत आहे. सदर कामामध्ये असावे 3)नागरी दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०१५-१६ :- तहसील कार्यालयपासून ते दलीतवस्ती रसुल दर्गापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्तावर एकही घर किंवा दलित वस्ती नसुन तरी सुध्दा निधीमधुन असे एकुण ९ टप्प्यामध्ये सी. सी. रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे, प्रत्येक टप्याची अंदाजीत रक्कम २४,९९,९००/- रूपये एवढी आहे. नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी प्रमाणपत्रावर असे उल्लेख केले की, अर्धापूर शहरामध्ये १ ते ९ टप्यात रेखानकाशे वरील भागात दलितवस्तीची लोकसंख्या ५०% पेक्षा जास्त आहे. करीता लोकसंख्या प्रमाणपत्र देण्यात येत आहे. असे प्रमाणपत्र देवुन दलितवस्ती निधीमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे असे दिसुन येत आहे. ४) अर्धापूर शहरातील १ ते १७ वार्डामध्ये होत असलेल्या नाली वरील ब्रिज (ढाकन) चे काम :- सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. कारण वार्ड क्र. १० मधील गेल्या २ महिण्यात एकाच नालीवरील दोन वेळेस ब्रिज(ढाकन) टाकण्यात आले. आणि सदर ब्रिज आजघडीला तुटलेले आहे. तसेच वार्ड क्र.११ व १२ मधील नालीवरील ब्रिज (ढाकन) १५ दिवसाच्याआत तुटला, सदर कामामध्ये गजाळीचा वापर करण्यात आलेला नाही. सिमेंट व गिटटीचा सुध्दा अत्यंत कमी प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे. सदर कामामध्ये सुध्दा भ्रष्टाचार झालेला आहे असे स्पष्ट दिसुन येत आहे. सदर कामाचे बिल/देयक रोखण्याचे संबंधीत कार्यालयास आदेश देण्यात यावे. ५) B and C विभाग, नांदेड मार्फत :- चालु असलेले अर्धापूर शहरातील मोठया नालेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामासाठी अंदाजीत २ कोटी रूपये निधी मंजुर झालेला आहे. संबंधीत विभागाने दिलेल्या आदेशानुसार काम करणारे गुत्तेदार / कंत्राटदार अटी व शर्तीप्रमाणे काम करीत नाही. सदर नालीचे बांधकाममध्ये कोणत्याही प्रकारचे रेतीचा वापर करीत नाही. तसेच एक ते दिड फुटावर गजाळीचा वापर करीत आहेत. सदर काम अत्यंत बोगस होत असुन शासनाच्या पैश्याचा अपहार होत आसतांना दिसुन येत आहे. ६) अर्धापूर शहरातील विविध समाजाच्या स्मशाम भुमीचे काम :- या कामामध्ये सुध्दा मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. सन २०१५ मध्ये लिंगायत समाजाच्या स्मशान भुमीसाठी निधी मंजुर झालेले होते. परंतु सदर निधीचा वापर स्मशान भुमीचे बांधकाम न करता संपुर्ण निधी भ्रष्टाचार करून हडप करण्यात आलेली आहे. पुन्हा त्याच समाजाच्या स्मशान भुमीचे काम सध्या वार्ड क्र.१० मधील गट क्र. ८२५ मध्ये गेल्या १ महिण्यापासुन सुरू आहे. सदर सुरू असलेल्या स्मशान भुमीच्या कामासाठी जी.बी. मिटींगची मान्यता सुध्दा नाही. तरीसुध्दा सदर काम सुरू करण्यात आलेले आहे. सदर कामामध्ये सुध्दा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असे दिसुन येते त्यामुळे सदर कामाची आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी.सदर ७) शहरामधुन जाणारा मुख्य रस्तावर वसमत फाटा ते बायपासरोड पर्यत लाईट-पोल चे काम :- या कामासाठी सन २०१४-२०१५ मध्ये लाईट पोलसाठी कोटयावधी निधी मंजुर झाले होते. कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. सदर पोल टाकण्यासाठी नगरपंचायत कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग,नांदेड यांची परवानगी न घेता रोडच्या मध्यभागी असलेल्या डिवायडर वर लाईट पोल टाकले व झाडे लावण्यात आले. सदर टाकलेले पोल अत्यंत निकृष्ट दर्जाचे टाकण्यात आलेले आहे. सदर कामाबाबत मी अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयात तक्रार केलेली आहे. परंतु आजपर्यंत माझ्या अर्जावर कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही किंवा कार्यवाही पान नं. ३ वर करण्यात आलेली नाही.अर्धापूर ते पांगरी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर लाईट पोलचे काम :- सदर कामामध्ये लाखो रूपये मंजुर करून सदर लाईटपोलचे काम अर्धापूर शहरामध्ये न करता अर्धापूर शहराच्या बाहेर करण्यात आले आहे. सदर लाईटपोलचा फायदा अर्धापूर शहरवासीयांना होत नाही. सदर काम विद्युत विभागामार्फत करण्यात आले असुन अर्धापूर शहर वासियांचे काम न करता आपल्या फायदयासाठी ज्याठिकाणी नागरीकांची वस्तीनाही अशा ठिकाणी लाईटपोल टाकण्यात आलेले आहेत. सदर काम तात्काळ थांबविण्याचे आदेश देवुन संबंधीत कामाची चौकशी करून दोषी कर्मचारी/अधिकारी व ठेकेदार / कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करावी. ९) पाणी पुरवठा योजने २८ कोटी रूपये :- सदर पाणी पुरवठा योजना अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाची झालेली आहे. अधोपूर शहरामध्ये तलाव असुन / नगराध्यक्ष/अधिकारी सुध्दा संबंधीत क्षेत्रातील आमदार /कंत्राटदार/नगरसेवक यांनी आपल्या टक्केवारीसाठी सदर योजनेसाठी अर्धापूर येथुन अंदाजे १२ किमी अंतरावर असलेले निमगांव तलावातुन पाईपलाईनव्दारे पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात आलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत अर्धापूर शहरवासियांना सदर योजनेतून दररोज पाणी मिळत नाही. मी २ महिण्यापुर्वी युटयुब न्युज पोर्टलवर https://youtu.be/6YFE8qkkodc या लिंगवर विडींओ टाकले होते. या विडीओ टाकण्यापुर्वी अर्धापूर शहरवासियांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. सदर विडीओ आल्यानंतर सदर भ्रष्टाचारी लोकांच्या पाया खालील जमीन सरकली. त्यानंतर संबंधीत कार्यालयाने तात्काळ कोंढा नदीवर असलेले विहीरतुन पाईपलाईन जोडुन अर्धापूर शहरात पाणी आणले आणि या सोबत कोंढा नदीवर लाईट पोल टाकुन विद्युत कनेक्शन घेण्यात आले. परंतु आजपर्यंत हे काम सुध्दा सुरू झालेले नाही. आणि अर्धापूर शहरवासियांना बरोबर पाणी मिळत नाही. अर्धापूर पाणी पुरवठा विभागात अनेक वेळा कोटयावधी रूपयाचे निधी आणुन सुध्दा अर्धापूर शहरवासियांना कनेक्शन घेवुन ही पाणी पुरवठा योजनेचा लाभ मिळालेला नाही