डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त हिन्दी निबंध स्पर्धेचे आयोजन…
माजी आमदार अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण
अर्धापूर दि.१९.ता.प्र.
अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्यावतीने भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा जलसंस्कृतीचे जनक कै.डॉ.शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त व विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान व्हावे या हेतूने *डॉ.शंकररावजी चव्हाण जीवन व कार्य* या विषयावर हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाने केले होते.
सदरील निबंध स्पर्धा पीपल्स कॉलेज नांदेड व शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आले असून यात अनेक विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता. यातील अनुक्रमे प्रथम शंकरराव चव्हाण महाविद्यालयाची कु. प्रियंका गोविंद सोळंके, द्वितीय कु. गुंडले शितल नारायण तर पीपल्स कॉलेज नांदेडची कु.गायकवाड आकांक्षा रमेश तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ म्हणून कु. क्षीरसागर अंकिता काशिनाथ व कु. गिरी ज्योती कैलास यांना भोकर विधानसभेच्या माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र व नगदी स्वरूपातील रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ उर्फ अनिल मोरे, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडचे सहसचिव अँड.उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, कार्यकारणी सदस्य नरेंद्रदादा चव्हाण, आमराबाद येथील जेष्ठ सरपंच शामराव पाटील टेकाळे, अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसव्वीर खतीब, प्रवीण देशमुख, राजू शेटे, डॉ.विशाल लंगडे, प्राचार्य डॉ.के.के.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ.रघुनाथ शेटे, हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.जलालखान पठाण, प्रा.डॉ. काझी मुक्तारोद्दीन देळुबकर, प्रा. राम राजेगोरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.