राजकारण

उमरखेड महागांव/ आमदार श्री.नामदेवराव ससाने. यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे दिले शेतकऱ्यासाठी निवेदनपत्र 

उमरखेड महागांव/ आमदार श्री.नामदेवराव ससाने. यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे दिले शेतकऱ्यासाठी निवेदनपत्र

 

 

महागांव प्रतिनिधी/ एस के शब्बीर

 

 

उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी भेट घेऊन शेतकऱ्यांसाठी एक हात मदतीचा सहाय्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांच्याशी परस्पर भेट घेऊन निवेदन पत्र दिले या निवेदन पत्रात झालेल्या पिकाची नुकसान पिक विमा साठी सरसकट मागणी केली.मागील आठवड्यात सहा दिवसापासून उमरखेड महागांव क्षेत्रात पावसांनी सतत हजेरी लावल्यामुळे शेत जमिनीतील सोयाबीन कपाशी तूर जव्हार या पिकाला मोठा फटका बसला आहे या पावसाने बळीराजा शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे प्रचंड अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले असे चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना बोलताना माहिती दिली व उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रात दरदिवशी १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडल्याने शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे व पैनगंगा नदी नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतजमीनी रगडली व शेतामधील विहीरी खचुन गेल्या आहेत . एकट्या उमरखेड तालुक्यामध्ये २४ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे उमरखेड महागांव क्षेत्रफळात शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा नुकसान भरपाई द्यावी असे चर्चेमध्ये बोलताना आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब यांनी आज मुख्यमंत्री महोदयाकडे निवेदन .पत्रात सांगितले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *