ताज्या घडामोडी

करंजी येथे पावसामुळे नुकसान झालेले घरांची व शेतीची पाहणी करून केले पंचनामे

करंजी येथे पावसामुळे नुकसान झालेले घरांची व शेतीची पाहणी करून केले पंचनामे

 

लवकरच शासकीय मदत मिळवून देण्याचे तलाठी दिलीप मेतलवाड यांचे आश्वासन.

 

हिमायतनगर (विकास गाडेकर)

 

तालुक्यातील मौजे करंजी येथे मुसळधार पावसामुळे करंजी येथील शेतीचे व घराची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आज दिं 16 जुलै रोजी दूधड सज्जाचे तलाठी दिलीप मेतलवाड यांनी करंजी येथील घराची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे केले आणि करंजी येथील नुकसानग्रस्त लोकांना लवकरच मदत मिळून देणार असे आश्वासन दिले आहे.

हिमायतनगर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील अनेक खेडेपाड्यातील घरांचे व शेतकरी्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील तलाव,नदी,नाले,ओढे,क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात पाण्याने वाहत असल्यामुळे पेरणी केलेले उगवलेल्या कोवळ्या पिकासह जमिनी खरडून गेल्या तर काही जमिनीमध्ये तलावासारखे मोठ्या पाणी साचून बसले आहेत तसेच अनेक खेड्यापड्यातील गोरगरीब लोकांचे अनेक मातीची घरे पडली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच करंजी येथे ही सतत आठ दिवसाच्या मुसळधार पावसामुळे शेतीच्या व पडझड झालेल्या घराच्या नुकसानीची माहिती करंजी येथील काही गावकऱ्यांनी दुधड सज्जाचे तलाठी दिलीप मेथलवाढं यांना लक्षात आणून दिली असता त्यांनी आज 16 जुलै रोजी हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथे भेट देऊन पडझड झालेल्या घराची व शेतीची पाहणी करून पंचनामे करून करंजी येथील नुकसानग्रस्त सर्व लोकांना नुकसानीची तात्काळ मदत मिळवून मिळणार असे दूधड सज्जाचे तलाठी दिलीप मेथलवाढ यांनी सांगितले आहे यावेळी नासर पठाण, बालाजी पुट्टेवाड,पांडुरंग सूर्यवंशी,परमेश्वर सूर्यवंशी, मारुती गाडेकर,विकास गाडेकर, श्रीराम गायकवाड, गणेश जाधव, गजानन जाधव,आदीजन यावेळी उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *