ताज्या घडामोडी

महागांव:अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत द्या-स्वाभिमानी शेतकरी संघटना 

महागांव:अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत द्या-स्वाभिमानी शेतकरी संघटना

महागांव:एस के शब्बीर यांची बातमी

महागांव तहसील कार्यालयावर सरसकट आर्थिक मदत देण्यासाठी तहसीलदार साहेब यांना दिले निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विना पंचनामा सरसकट आर्थिक मदत देण्याची केली मागणी

मागील आठवड्या भरापासून जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक विवांचनामध्ये सापडलेला आहे मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी संकटाचा सामना सुद्धा करावा लागत आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत गेले आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा पाणीच पाणी साचले यासाठी शेतकरी मरणाच्या उंबरठ्यावर उभा असून शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळण्याची गरज आहे .

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेची माहिती मिळत नाही व शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा मिळत नाही आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सतत गैरहजर असतात वेळेवर शेतकऱ्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे जिल्हा प्रशासनाकडून कृषी विभागावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. असे शिवानंद राठोड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले . आहे

तहसीलदार महागाव मार्फत जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले ह्यावेळी निवेदन देताना महागाव तहसील कार्यालयात शेतकरी उपस्थित होते शिवानंद राठोड (युवा जिल्हाध्यक्ष )प्रमोद अडकिने (युवा तालुका अध्यक्ष ) दीपक हाडोळे (युवा ता.उपाध्यक्ष )सचिन उबाळे.सचिन शेळके.रामचंद्र चव्हाण. अंकुश उबाळे ,संदीप कोमवाड ‘अनिल राठोड ,दत्ता माने ,गोर बाळूभाऊ राठोड (बंजारा परिषद ) व इतर शेतकरी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *