उमरखेड:ब्राह्मणगाव येथे सत्कार सेवानिवृत्त शिक्षकांचा सह पत्नीस सत्कार
उमरखेड प्रतिनिधी/ सुभाष वाघाडे
उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक विसांबर दत्तात्रेय लंकलवाड यांचा सौभाग्यवती कमलताई लंकलवाड सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्काराची छोट्या छोट्या खाली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विस्ताराधिकारी खांडरे साहेब तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक परमात्मा जी गरुडे साहेब सेवा केंद्र माजी केंद्रप्रमुख सर तेजमल गांधी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश सुधाकर वानखेडे सर व अरविंद धबडगे नयन पुदलवाड दत्तात्रय लंकलवाड ब्राह्मणगाव बीट चे जमादार संदीप भाऊ सरनाईक तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख श्यामसुंदर हमंद तसेच रामगाव केंद्रातील ब्राह्मणगाव केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सेवानिवृत्त शिक्षक लंकलवाड यांच्या जीवन चरित्रावर अनेक मान्यवरांनी भाषणे केली व त्यांचा गुण गौरव केला कशाप्रकारे ते सेवा 33 वर्षाची सेवा किती आनंदाने पार पाडली तसेच त्यांच्या जुन्या आठवणीला उजाळा देऊन त्यांचा गुण गौरव केला त्यांनी हालकीच्या परिस्थितीमध्ये आपल्या आर्थिक परिस्थिती दोन हात करून कशा पद्धतीने शिक्षण घेऊन समाजसेवा केली त्यांचे जिवंत उदाहरण म्हणून प्रास्ताविक मध्ये कैलास कोंढरवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विस्तार अधिकारी म्हणून खांडरे सरांनी मागील आठवणींना उजाळा देऊन स-पत्नीस त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला ब्राह्मणगाव केंद्रातील सर्व शिक्षक बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते प्रास्ताविक कैलास कोंडरवाड सरांनी केले तर आभार प्रदर्शन सौ रेशमी ताईंनी केलय
जिल्हा प्रतिनिधी:एस के शब्बीर