जवळगावकर दिव्यांग बांधवांचे बनले आधारवड २ हजार दिव्यांग बांधवांची शिबीराला उपस्थिती.
नांदेड हदगांव / एस के चांद यांची रिपोट
हदगाव शहरामध्ये हजारोच्या संख्येने दिव्यांग बांधव यांनी उपस्थित राहून मोफत साधने वाटपाचा घेतला लाभ हदगाव हिमायतनगर चे आमदार मंत्र पाटील जळगावकर यांनी घेतलेल्या मोफत साधने वाटपाच्या शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घेतलेला पाहावयास मिळाला आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मागील काही महिन्यांपूर्वीच दिव्यांग बांधवांना व्हील चेअर वाटप केले होते. आमदार यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यात सर्वप्रथम हदगाव येथे आ . जवळगावकर यांच्या प्रयत्नातून दिव्यांग बांधवांच्या मोफत साधने वाटपाच्या पार पडलेल्या शिबीरात मोठा प्रतिसाद मिळाला असून या शिबीरात हजारोच्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते व त्यांनी या शिबिराचा लाभ ही घेतला . या • शिबीरास उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील , तहसीलदार जीवराज डापकर , नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी दामोदर जाधव , वैद्यकीय अधीक्षक डॉ . व्ही . जी . ढगे , डॉ . प्रदीप स्वामी , पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड , काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आनंद भंडारे , जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील , अनिल पवार , माजी नगराध्यक्ष अमित आरसूळ , सुभाष राठोड. हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते या शिबिरासाठी कृष्णा पवार यांनी परिश्रम घेतले.