हिमायतनगर तालुक्यातील विरसनी हद्दीतील पैनगंगा नदीतून अवैधरित्या होतेय रेतीची चोरी विदर्भाचे पथक आल्याचे समजताच ५ ते ७ ट्रॅक्टर रेती माफियांनी काढला पळ.
एस.के.चांद यांची रिपोट हिमायतनगर
हिमायतनगर भागातील काही रेती तस्करांनाही पैनगंगा नदीतील लिलाव न झालेल्या | विरसनी बंधाऱ्यापासून रेतीचोरीचा गोरखधंदा या हिमायतनगर तालुक्यातील महसुलाचे पथक कुंभकर्णी झोप घेऊन आपला स्वार्थ साधत असल्याचा आरोप हिमायतनगर तालुक्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी करून हिमायतनगर महसूल विभागाची पोलखोल केली आहे . नुकतीच काही दिवसापूर्वी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील एका वाहनावर कार्यवाही केल्याची माहिती उमरखेड महसूल प्रशासनाने दिली आहे . भागातील तलाठी , मंडळ अधिकाऱ्याच्या संगनम ताने सुरु केला आहे . असे असताना देखील हिमायतनगर भागातील अधिकारी स्वार्थापोटी कार्यवाही करण्यास तयार नसले तरी विदर्भातील महसूल पथक आल्याचे समजताच हिमायतनगर तालुक्यातील ५ ते ७ ट्रैक्टर रेती माफियांनी पळ काढला आहे . अशी माहिती विदर्भातील एका अधिकाऱ्याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली असून यावरून हिमायतनगर महसूल | अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणाबाबत प्रश्नचिन्ह निम णि केले जात आहे . तर अनेक रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने त्या घाटावरून राजकैय वरद हस्ते असलेल्या लाही वाळू दादांनी आपला रेती चोरीचा गुरखधंदा सुरु केला आहे . या प्रकारची माहिती संबंधित तहसीलदार , नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी व तलाठ्यास असताना देखील केवळ खाबुगिरीची सवय जडल्यामुळे स्वार्थापोटी शासनाच्या महसुलावर दलाल मरणाऱ्यांना अभय देत आहेत . गेल्या अनेक वर्षापासून विदर्भ | मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरून चोरीच्या मार्गाने राजकीय वरद हसत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील विविध गावच्या ट्रैक्टर वाहनधारकांनी रेतीचोरीचा गोरखधंदा चालविला होता . याबाबत वर्तमानपत्रातून | आवाज उठविल्यानंतर यंदा महसूल विभागाने | रेती लिलावाचा अहवाल पाठविल्यानंतर | जिल्हाधिकारी डॉ . विपीन यांच्या पुढाकाराने ५ रेतीघाटाचे लिलाव करण्यात आले आहेत . दि . १३ मी रोजी देखील दिघीसह काही रेती माफियांनी विल्सन येथील बंधाऱ्याच्या जवळून रेती उपास सुरु केला , याबाबतची माहिती मिळल्यानंतर उमरखेड विभागाचे तलाठी थोरवे यांनी सकाळी ८.३० वाजता आपल्या पथकांसह या भागात रेती तस्करी होत असल्याचे समजल्यानंतर छापा टाकण्यासाठी नदीत दाखल झाले . मात्र हिमायतनगर तालुक्यातील ५ ते १७ ट्रॅक्टर वाहन घेऊन फरार झाले असल्याने कार्यवाही होऊ शकली नाही . मात्र यापुढे असे प्रकार आढळून असल्यास त्या रेती माफियांच्या मुसक्या आवळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही . अशी प्रतिक्रिया त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली . तर तुमच्या हिमायतनगर भागातील महसुलाचे लोक या रेतीचोरावर कार्यवाहाची का करत नाहीत असा सवालही पथकातील काहींनी उपस्थित केला आहे . तर ज्या ठिकाणी लिलाव झाले ते ठिकाण सोडून अन्य ठीकाणाहून रेतीचा उपास करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यापासून सुरु केला आहे . याबाबतची माहिती मिळाल्यानंतर विदर्भातील महसूल पथकाने हिमायतनगर हद्दीतील लिलाव न झालेल्या ठिकाणावर छापे मारून कार्यवाहीला सुरुवात केली आहे.