उमरखेड तालुक्यातील/सुकळी (ज) येथील १४/मे च्या मध्यरात्री दोन घराला आग
दिनांक 14 मे च्या मध्यरात्री दोन घराला आग लागल्याने मौलाना शेख मदार शेख चांद. व शकील खान चांद खान राहणार सुकळी या दोघांच्या घराला आग लागल्याने परिवारात जीवित हानी होता होता टळली त्यांच्या घरातील सर्व वस्तू जळाल्या असून यात अदांजे 2.5 लाखाचे नुकसान झाल्याची माहिती शकील खान चांद खान यांनी सांगितले
यांच्या घराला रात्री ३ वाजता च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून त्यामध्ये मौलाना शेख मदार शेख चाँद यांच्या घराला आग लागली होती त्या शेजारील शकील खान यांच्या घराने पेट घेऊन शकील खान यांचे सुद्धा घर उद्ध्वस्त झाले त्यांच्या मुलीचे लग्न विवाह दिनांक 12 मे 2022 रोजी झाले असून खुशीच्या वातावरणामध्ये शकील खान यांच्यावर दुःखाचे डोंगर पसरले आहे अशी माहीती आमच्या टीव्ही नाईन माझा प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांनी प्राप्त माहिती दिली आहे
हे घर कसे जळाले यांचे कारण अजून समोर आले नसून
पूढील तपास उमरखेड पोलिस स्टेशनचे बिट जमादार गजानन राठोड करीत आहे
tv9maza लाईव्ह न्युज चे प्रतिनिधी एस के शब्बीर