महागांव/ नैसर्गिक मृत्यू झालेल्या कोरोना काळात कुटुंब व्यक्तींना.२० हजार
जिल्हा प्रतिनिधी / एस के शब्बीर
शासनाच्या संजय गांधी विभागातर्फे “राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने”अंतर्गत महागाव तालुक्यातील पंचेचाळीस लाभार्थ्यांना प्रत्येकी विस हजार रुपयांचे धनादेश महागाव तहसील कार्यालयात वितरीत करण्यात आले. करोना काळात बऱ्याच कुटुंबातील कुटुंब प्रमुख मृत्यू पावलेत. त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले.शासनाच्यायोजने अंतर्गत दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांनाच या योजनेचा लाभ होतो . तहसिल कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उमरखेड विधान सभेचे आमदार श्री नामदेवराव ससाणे साहेब. आणि तहसीलदार श्री विश्वंभर राणे साहेब ह्यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला ., ह्या प्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना आमदार साहेबांनी त्यांना आश्वासन दिले की” मला तुमचा भाऊ समजा आणि तुम्हाला भविष्यात जी काही अडचण भासल्यास माझ्याशी संपर्क साधा मी आपणास योग्य ती मदत करेन आणि पुढेंअसेही ते म्हणाले की “तुम्ही शेतात रोज मजुरी करण्यापेक्षा घरीच उद्योग सुरू करावा.” आमदार साहेबांच्या पुढाकाराने त्यानी शिलाई मशीन आणि चक्की आटा मशीन निम्म्या किमतीत जनतेला उपलब्ध करून दिल्यात त्याचा लाभ घ्यावा.. ह्या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. करूणा ताई शिरबिरे,उपनगराध्यक्ष सुरेश पाटिल, नायब तहसिलदार मायाताई ढोके. नायब तहसीलदार सुनील देशमुख.नगरसेविका आशा ताई बावणे, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक आडे, जेष्ठ पदाधिकारी विलास शेबे, तालुका उपाध्यक्ष संजय चिंतामणी, हरीभाऊ खंदारे. ई. उपस्थित होते.