उमरखेड बिटरगाव/ गरोदर मातेचा खराब रस्त्यांनी घेतला बळी
जिल्हा प्रतिनिधी /एस के शब्बीर यांची रिपोर्ट
उमरखेड : तालुक्यातील ढाणकी ते बिटरगाव या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे या रस्त्याने पायी चालणे सुद्धा अवघड झाले असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताची वाढ झाली असून खराब रस्त्यासाठी उमरखेड उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा नागरिकांनी केले आंदोलन नादुरूस्त रस्त्यांमुळे बाळ व बाळंतिनिचा दुर्दैवी अंत. प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर न पोहोचता उपचाराअभावी गरोदर मातेचा व पोटातील बाळांचा दुर्देवी मृत्यू या रोड ची दशा पाच ते सहा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे या अपघातात . जीवघेण्या रस्त्याबाबत चे नुतनीकरण , डांबरीकरण करण्याकरिता या भागातील नागरिकांनी पत्रकार बांधवांनी निवेदन देऊन सदर रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी घेऊन अनेक आंदोलने सुद्धा केली . परंतु उमरखेड उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागांनी कोणतेही पाऊल उचललेले नाही बांधकाम विभागाचे सदर रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे निवेदन व आंदोलनाची सुद्धा नागरिकांनी पाऊल उचलले होते बांधकाम विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल अभियंत्याकडून दिसून आली नाही या नादुरुस्त रस्त्यामुळे बाळ व बाळवंतीचा . रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागले