महागाव फुलसावंगी/प. स स्तरावर बैठक शिवसंपर्क अभियान माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार
एस के शब्बीर यांची रिपोर्ट
दिनांक 22 ते 25 दरम्यान शिवसंपर्क अभियान आयोजित आहे.यवतमाळ जिल्ह्या करिता शिवसेना उपनेते माजी मंत्री माननीय खासदार अरविंद सावंत साहेब व यवतमाळ जिल्ह्या करिता पाठवलेली निरीक्षकांनी चमू पंचायत समिती/जिल्हा परिषद स्तरावर शाखा प्रमुख विभाग प्रमुख, महीला संघटीका, युवासेना युवा अधिकारी यांच्या बैठक घेउन शिवसेनेची संघटनात्मक बांधणी व पक्षाची पुठील वाटचाल याविषयी मार्गदर्शन करण्याच्या हेतूने पंचायत समिती स्तरावर बैठका घेऊन शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे त्या करिता दिनांक २४ रोजी फुलसावंगी प स गणामध्ये शिव संपर्क अभियान राबविण्यात आले या प्रसंगी मुंबई वरून आलेले मुंबादेवी विधानसभा उप विभाग प्रमुख सूनीलजी कदम, व वरळी विधानसभेतील पदाधिकारी श्री विजय भनगे, यांनी मार्गदर्शन केले, या प्रसंगी विधानसभा संघटक डॉ विश्वनाथ विणकरे,प्रमोद उर्फ शाखा भरवाडे तालुका प्रमुख महागाव, उप जिल्हा संघटक राजेश खामनेकर, युवासेना युवा जिल्हाधिकारी विशाल पांडे, तालुका संघटक रवींद्र भारती, युवा सेना तालुका युवा अधिकारी रामचंद्र तंबाके, कैलासजी कदम,
रामजी जंगले, आनंदराव तोडकर, विकास मस्के सरपंच हे प्रामुख्याने उपस्थित होते.
*शिव संपर्क अभियानाचे आयोजन फुलसावंगी सरकल च्या वतीने
उपतालुका संघटक अनिल गवळी, ग्रा.पं सदस्य तथा शहर संघटक अनिल राठोड, विभाग प्रमुख नितिन उबाळे, फुलसावंगी शहर प्रमुख मनोज रणखांब, उपशहर प्रमुख यादव वाघमारे यांनी केले होते.
त्याकरिता अक्षय शेळके दतराम आडे, नितिन पवार सर, पंडित जाधव,विजय जाधव, उत्तम हाके, अनिल राऊत, चिंचोली चे शाखाप्रमुख लक्ष्मण राठोड, शिवाजी कचेवाड राहुर,गजानन वाघमारे, बालाजी कानोडे, अमोल मीरासे व फुलसावंगी सर्कल मधील सर्व शाखाप्रमुख व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना महागाव शहर प्रमुख राजू राठोड यांनी केले.