राजकारण

ब्राह्मणगाव येथे नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करा अन्यथा सरपंचासह गावकरी उपोषणाला बसण्याचा इशारा.

ब्राह्मणगाव येथे नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करा अन्यथा सरपंचासह गावकरी उपोषणाला बसण्याचा इशारा.

 

प्रतिनिधी उमरखेड / शुभाष वाघाडे

 

उमरखेड तालुक्यातील अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांच्याकडे वेळोवेळी केली आहे . ब्राह्मणगाव ब्राह्मणगाव येथील ग्राम विकास अधिकारी श्री एस बी पाडळकर हे निलंबित झाले असून दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून ग्रामपंचायत ब्राह्मणगाव येथे नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही . त्यामुळे ग्रामपंचायत ब्राह्मणगाव येथील अनेक विकासात्मक कामे रखडली आहे चालू वषार्चा मार्च महिना असल्याने अनेक कामे थंडबसत्यात आहे . ब्राह्मणगाव येथील ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवकांची अत्यंत गरज असल्याकारणाने ब्राह्मणगाव येथील सरपंच परमात्मा गरुडे व अरविंद धबडगे यांच्यासह गावकरी मंडळींनी अनेक वेळा ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक मिळण्याची मागणी गट विकास तरी देखील ग्रामपंचायत ब्राह्मणगाव यांना ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक दिला नसल्यामुळे ग्रामपंचायत मधील अनेक व्यवहार करण्यास सरपंच व अन्य कर्मचारी यांनी अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे . लवकरात लवकर ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची निवड न केल्यास नाईलाजास्तव आमरण उपोषण चा इशाराही ब्राम्हणगाव येथील सरपंच परमात्मा गरुडे , उपसरपंच प्रियांका गोरे , अरविंद धबडगे , व अन्य ब्राम्हणगाव येथील नागरिकांनी निवेदनातून दिला आहे .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *