सुडभावनेचे राजकारण करत असेल तर भाजप खपवून घेणार नाही भाजपचे हिमायतनगरात निषेध
नांदेड हिमायतनगर / एस. के. चांद यांची बातमी
फोन टँपिंग प्रकरणी महाराष्ट्रचे विरोधी पक्षनेते विधानसभा मा श्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र शासन व मुंबई पोलीस यांच्या सूड भावने व कुबुद्धीने यांच्यावर बजावलेल्या नोटीस चा जाहीर निषेध करण्यासाठी आज दि. १३मार्च २०२२रोजी श्री प्रमेश्वर मंदिर समोर खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाअध्यक्ष मा व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महा विकास आघाडी राज्य सरकारच्या नाहक बदनामी कारक कृत्या विरोधात बजावनात आलेल्या नोटिसीचे दहन करण्यात आले व उध्दव ठाकरे सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या विजय असो ..
हर हर मोदी घर घर मोदी…
मा देवेंद्रजी फडणवीस अंगार है
बाकी सब भंगार है,
देवेंद्रजी फडणीस संघर्ष करो हम तुम्हारे साथ है हमारा नेता कैसा हो देव्रेंद्रफडणीस जैसा हो.
आशा घोषनांनी श्री प्रमेश्वर मंदिर परिसर दणाणून गेला होता यावेळी भाजपा शहर अध्यक्ष श्री खंडु एम चव्हाण युवा मोर्चा शहराध्यक्ष राम जाधव अल्पसंख्याक ता अध्यक्ष हिदायत खान,सुभाष माने,सोनु कोमावार,गंगाधर मिरजगावे, सो मि ता अध्यक्ष विनोद दुर्गेकर,सोनारीकर विनायक ढोणे, महेश काळे, बालाजी ढोणे,परमेश्वर जाधव,प्रशांत ढोणे, अजय सुनकुलवार,संदिप पागडपवार, यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठा संख्या. उपस्थित होते.